दै चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
बाजीराव गायकवाड
नांदेड/लोहा:-लोहा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा कौडगाव येथिल मय्यत शिक्षक गोविंद गव्हाणे यांना लिव्हर चा आजार होता त्यांच्या मुलाने लिव्हर देऊन सुद्धा ते जगू शकले नाहीत.त्यांनी व्याजाने कर्ज काढून अपोलो हाॅस्पीटल हैद्राबाद येथे उपचार केले होते.हे सर्व मुख्याध्यापक आनंदा लांडगे यांना माहीत असूनही आपल्याच शाळेतील मय्यत शिक्षक गोविंद गव्हाणे यांचे अंतिम पगारपत्रक तिनं महीन्यापासून देत नाहीत उलट मय्यत शिक्षकांची पत्नी विमल पानपट्टे यांचा छळ करीत आहेत.भविष्य निर्वाह निधीचे पैसे पगारातून कपात केले परंतु ते भविष्य निर्वाह निधी कार्यालयात जमा केलेच नाहीत.त्यामुळे मय्यत शिक्षकाच्या कुटुंबियांना भविष्य निर्वाह निधीचे पैसे मिळत नाहीत.आनंदा लांडगे हा मुख्याध्यापक पदाला काळीमा फासणारा नराधम असून मेलेल्या शिक्षकाच्या पत्नीचा छळ करीत आहे म्हणून याच्यावर कारवाई करण्याची गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली असून.तिन महीन्यापासून विधवा शिक्षेकेला गटशिक्षणाधिकारी यांच्या कडे फेऱ्या माराव्या लागत आहेत.गटशिक्षणाधिकारी विधवा शिक्षेकेला तिनं महीन्यापासून न्याय देत नाहीत.त्यामुळे मुख्याध्यापका विरोधात आंदोलन करण्याचा इशारा शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष आंबुलगेकर यांनी दिला आहे.
