दै.चालू वार्ता उपसंपादक आष्टी
अवधूत शेंद्रे
वर्धा – आर्वी :- भाजपा लोकसभा निवडणूक प्रमुख सुमित वानखेडे यांच्या प्रयत्नांने आर्वी नगरपरिषदेला अग्नीशमन वाहन खरेदी साठी ९० लाख रूपये मंजूर करण्यात आले असून नव्या अग्नीशमन वाहनामुळे आर्वीसह परीसरातील लोकांना अग्नीजन्य परीस्थितीत आपत्ती व्यवस्थापनात मदत होऊन दिलासा मिळेल.आर्वी नगरपरिषदला असलेले अग्नीशमन वाहन जुने झाल्याने आर्थिकदृष्ट्या किफायतशीर नव्हते. त्यामुळे नगरपरिषदला नवीन अग्नीशमन वाहन मिळावे यासाठी सुमित वानखेडे यांना अवगत करण्यात आले होते. त्यानंतर सुमित वानखेडे यांनी आर्वी नगरपरिषदला नवीन अग्नीशमन वाहन मिळावे यासाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला त्याचे फलित म्हणून शासनाने वाहन खरेदी प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
सुमित वानखेडे आर्वी मतदारसंघातील समस्या निकाली काढण्यासाठी यशस्वी प्रयत्न करत असल्याच्या प्रतिक्रिया सर्वच स्तरातून उमटत आहे
