दैनिक चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधीसंतोष मनधरणे
नांदेड ( देगलूर९) ; दिनांक 21 जून रोजी जागतिक योग दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो, योगासने करणे हे केवळ शारीरिक नाही तर मानसिक आरोग्यासाठीही चांगले असते. योगदिनाचे दिनाचे औचित्य साधून ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूल येथे आज दिनांक 21 जून 2024 रोजी जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला, कार्यक्रमाच्या वेळी योगशिक्षक म्हणून अमरजी वाघमारे तर अध्यक्षस्थानी डॉक्टर किरणजी सगरेपाटील- प्रणव निसर्गोपचार केंद्र, कार्यक्रमाच्या प्रमुख स्थानिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री रमेशजी बिरादार उपस्थित होते. यावेळी बोलताना अध्यक्ष यांनी मनोभावे करा योग होचाला निरोग या शब्दात आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या वेळी विद्यालयाचे आधीक्षक सुजितजी बिरादार, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती आम्रपाली सरवदे, विद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी रामेश्वरजी सगरे, विद्यार्थी,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
