दै.चालु वार्ता: प्रतिनिधी
अशोक कांबळे
गारगोटी: येथिल पतंजलि योग समिती भुदरगड, शाहू कुमार भवनगारगोटी व कर्मवीर हिरे महाविद्यालय गारगोटी यांच्या सयुक्त विद्यमाने के. एच. कॉलेजच्या मैदानावर २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात संपन्न झाला.
मा प्रार्चाय श्री. जी. एस. मांगोरे सर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन झाले मौनी विद्यापिठ मैदानावर पंतजलि योग समिती भुदरगड अध्यक्ष दतात्रय करवळ सर व पी. बी. दराडे सर यानी योगासनाची प्रात्यक्षिके करवून घेतली. सूर्य नमस्कार, दंड बैठक, वृक्षासन, ताडासन, त्रिकोणासन, भुजंगासन, शलभासन, ही आसने व कपालभाती, अनुलोम-विलोम भ्रामरी हे प्राणायामचे प्रकार घेण्यात आले. यावेळी दत्तात्रय करवळ सर यांनी योगाचे महत्त्व विशद केले. ते म्हणाले
“बदललेले पर्यावरण व बदलेली जीवन शैली यामुळे नागरीकांचा आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आरोग्य सपन्न नागरीक बनण्यासाठी योगासने हा उत्तम पर्याय आहे.”
शाहुकुमार भवन प्रशाळेचे मुख्याध्यापक एस. बी. शिदे, एन. सी. सी. विभाग प्रमुख- स्वाती यादव, सचिन भांदीगरे, कर्मविर हिरे महाविद्यालयाचे एन. सी. सी. विभाग प्रमुख- एस. डी. केने सर, सौ. इंदिरा माने, प्रार्चाया- पी. एस. देसाई, शेळके सर, मांडे सर, तसेच योग प्रेमी मोठ्या संखेने उपस्थित होते.
पतंजलि मार्फतच आनंदराव आबिटकर महाविद्यालय व पंचायत समिती भुदरगड येथे पतंजलि योगपीठ हरिद्वारचे मुख्य योग प्रशिक्षक- दतात्रय करवळ सर यानी योगाची प्रात्यक्षिके करून घेतली. या ठिकाणी कार्यक्रमाचे उद्घाटन आनंदराव आबिटकर यानी केले. दोन्हीही ठिकाणी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व शिक्षक स्टाफ उपस्थित होते
