दैनिक चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
नांदेड ( देगलूर): शासनाची तातडीची फीस भरल्यानंतर
विहित कालावधीत दाखले देणे बंधनकारक आहे. मात्र देगलूर कार्यालयात दररोज खेटे मारूनही संबंधित नागरिकांना दाखले मिळणे दुरापस्त झाले आहे. यामुळे येथील अधिकाऱ्याच्या आडमुठेपणा कारभाराचा जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या बाबीकडे लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित करावे अशी मागणी पुढे येत आहे.
देगलूर भूमी अभिलेख कार्यालयात बँकेच्या पीक कर्जासाठी लागणारे शेतकऱ्याला टोच नकाशा व प्लॉट व शेती कामातील अडचणी दूर करण्याच्या दृष्टीने तालुक्यातील जनता या कार्यालयात येत असतात. जमिनीसंबंधी क प्रत, नकाशा, आखीव पत्रिकाव टोच नकाशा इतर दाखल्यासाठी शासन नियमाप्रमाणे संबंधितांकडून फीस आकारले जाते. तातडी व अति तातडीची फीस भरल्यानंतर आठ दिवसाच्या आत दाखले देणे बंधनकारक असते तातडीची फीस भरल्यानंतर प्लॉट किंवा शेती चे मोजमाप करण्यासाठी ही बराच विलंब लावत असतात त्यानंतर मोजमापाचा नकाशा अथवा दाखला देण्यासाठी पुन्हा एकेक महिन्याचा कालावधी उलटला तरीही संबंधित यंत्रणेला याचे सोयर.. ना .. सुतक दिसून येत आहे. एकूणच प्लॉट किंवा जमीन धारकांना उपरोक्त दाखले देण्यास हेतू पुरस्पर टाळाटाळ करत सर्वसामान्य लोकांनावेठीस धरण्याचा करंडेपणा केला जात आहे. विशेष म्हणजे आडमागार्ने चिरीमिरीचा व्यव- हार झाल्यास त्वरित दाखले संबंधिताच्या हाती दिले जात असल्याचा आरोप केला जात आहे. उर्वरित लोकांना मात्र या ना त्या कारणा पोटी नंतर येण्याचा सल्ला दिला जात आहे. एकूणच आर्थिक व्यवहाराला प्राधान्य देत दुसऱ्यांना वेटीस धरणाऱ्या येथील भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून सर्वसामान्य नागरिकांचे कामे वेळेत कसी होतील याकडे लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावी अशी मागणी देगलूर तालुक्यातील जनते मधून होत असताना दिसून येत आहे.
