दै. चालु वार्ता
समिर शिरवडकर-रत्नागिरी.
राजापूर 🙁 लांजा) :- लांजा तालुक्यातील महावितरण च्या असणाऱ्या तक्रारी, वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा १२ ते १५ तास खंडित असणारा वीज पुरवठा अश्या अनेक समस्यांना त्रस्त झालेल्या लांजा वासीयांनी शिवसेना उपनेते तथा आमदार डॉ.राजन साळवी यांच्या नेतृत्वाखाली लांजा महावितरण कार्यालयावर धडक दिली. या वेळी उप अभियंता श्री.दयानंद अष्टेकार यांनी लोकांच्या समस्या त्वरित सोडवण्यासाठी श्री. निलेश कुलकर्णी (7875765306) यांची नोडल ऑफिसर म्हणून तातडीने नेमणूक करण्यात येत असल्याची तसेच आज पासूनच रात्रीसाठी लांजा शहरासाठी अतिरिक्त १ वायरमन नियुक्त करण्यात येत असल्याची माहिती दिली. याच सोबत तालुक्यातील पूर्व विभागातील गावांसाठी एकत्रित एक नवीन फिडर तळवडे रेल्वेस्टेशन ते आडवली या नवीन लाईन लवकरच तयार करण्यात येणार असल्याचे सांगितले.
तसेच *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी व उपस्थित ग्रामस्थ, व्यापारी यांनी शुक्रवार पर्यंत लांजा शहरातील व्यापारी व ग्रामीण भागातील नागरिकांच्या तक्रारी न सोडवल्यास शनिवारी शिवसेना स्टाईल आंदोलन करून महावितरण कार्यालयाला टाळ ठोकण्याचा इशारा दिला आहे.* त्याप्रसंगी उप जिल्हाप्रमुख जगदीश राजापकर, तालुकाप्रमुख संदीप दळवी, महिला तालुका संघटक लीला घडशी, युवासेना तालुका युवाधिकारी प्रसाद माने, युवती तालुका अधिकारी दीपाली दळवी, शहरप्रमुख नागेश कुरूप, युवासेना विधानसभा क्षेत्र युवाधिकारी राहुल शिंदे, विभागप्रमुख संतोष गुरव, उप विभागप्रमुख चेतन खंदारे, नगरसेवक स्वरूप गुरव, लहू कांबळे, राजू हळदणकर, काँग्रेस चे माजी शहराध्यक्ष राजेश राणे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष संदीप सावंत, नितीन शेट्ये, मंगेश उर्फ पप्पू मुळ्ये, मोहन तोडकरी, सरपंच विनया कुष्टे, राजाराम हरमले, उप तालुका युवाधिकारी विनय गुरव, बाबू गुरव, व ग्रामस्थ नागरिक उपस्थित होते.
