दैनिक चालु वार्ता
बीड जिल्हा प्रतिनिधी। किशोर फड
जिजाऊ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अनुभवले दैनंदिन बँक व्यवहार..
अंबाजोगाई शहरातील जिजाऊ विद्यालय या सेमी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांची सहशालेय उपक्रमा अंतर्गत अभ्यास दौरा क्षेत्रभेट ऑगस्ट २०२४ निमित्त अंबाजोगाई पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक शाखा जोगाईवाडी या बँकेत भेट दिली.
यावेळी बँकेतील कर्मचारी यांनी बँकेचे खाते उघडणे,पैसे भरणे, पैसे काढणे, कर्ज प्रकरण, आर.डी,एफ डी, लॉकर, तिजोरी इत्यादी बाबींची विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.
यावेळी विद्यार्थ्यांनी बँकेचे व्यवहार प्रत्यक्ष बँकेत जाऊन अनुभवल्याने निश्चितच विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासाबरोबरच दैनंदिन जीवनात आवश्यक असणाऱ्या व्यवहाराची माहिती मिळाली.
जिजाऊ विद्यालय नेहमीच विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगाने विकास व्हावा या उद्देशाने वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असते.
यावेळी विद्यार्थ्यांसोबत शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मोहिनी जाधव, मनीषा शिंदे, रंजना माळी, अनुराधा पांचाळ, ईश्वरी शिंदे, गीता सोळंके, अनुराधा पांचाळ या उपस्थित होत्या.
