भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा कसोटी सामना एडिलेटच्या मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी टीम इंडियाच्या गोलंदाजांना झुंजवलं.
ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लाबुशेन याने 64 धावांची अप्रतिम खेळी केली. तर ट्रेविस हेडने 140 धावा करत ऑस्ट्रेलियाला सामन्यात आघाडीवर नेलं. अशातच सामन्यात सिराजने केलेल्या एका कृतीमुळे वाद निर्माण झाला आहे.
ऑस्ट्रेलियन डावाच्या 25 व्या ओव्हरमध्ये मोहम्मद सिराज जेव्हा गोलंदाजी करणार होता, तेव्हा एक प्रेक्षक लांब बिअर कप घेऊन स्क्रीन जवळून गेला. त्यामुळे लाबुशेनने सिराजला थांबण्यास सांगितलं. सिराज लॉग रनअप घेऊन आला होता, त्यामुळे सिराजला राग आला. सिराजने बॉल फेकला नाही परंतू लाबूशेनच्या दिशेने रागात बॉल फेकला. त्यावेळी स्टंप्सला बॉल मिस करून बॉल विकेटकिपरच्या दिशेने गेला. मात्र, सिराजला यामुळे शिक्षा होऊ शकते.
आयसीसीच्या आचारसंहितेनुसार सिराजने नियमांचे उल्लंघन केले आहे. कलम 2.9 चे उल्लंघन केल्याबद्दल सिराजवर आरोप लावला जाऊ शकतो. सामन्यादरम्यान खेळाडू, क्रीडा कर्मचारी, पंच, सामनाधिकारी किंवा इतर कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीवर किंवा त्याच्या जवळ अयोग्य किंवा धोकादायक पद्धतीने फेकल्यास खेळाडूवर कारवाई केली जाऊ शकते. दरम्यान, सामनाधिकारी कोणताही अंतिम निर्णय घेतील. सिराजवर लेव्हल 1 अंतर्गत कारवाई होऊ शकते.
ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन : उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्विनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकिपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड.
टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन : यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकिपर), रोहित शर्मा (कर्णधार), नितीश रेड्डी, रविचंद्रन अश्विन, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
