[ बंद मध्ये संत महंतांचाही उत्स्फूर्त सहभाग ]
[ व्यापारी व हिंदू बांधवांनी नोंदवला उत्स्फूर्त सहभाग ]
दै. चालु वार्ता
भोकर प्रतिनिधी
विजयकुमार चिंतावार
भोकर /नांदेड –
बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाज भोकरच्या वतीने पुकारण्यात आलेल्या भोकर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून या निघालेल्या मूक मोर्चात तालुक्यातील नामवंत साधू संतांनीही मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदवला होता. तसेच सर्व व्यापारीही आपआपली प्रतिष्ठाणे बंद ठेवून या मूक मोर्चात सहभागी झाले व तहसीलदारांकडे तीव्र निषेधाचे निवेदन सादर करण्यात आले.
बांगलादेशातील हिंदू आणि इतर सर्व अल्पसंख्यांक समाजावर तसेच हिंदू धर्मांच्या साधू संतावर, मंदिरावर व महिलावरही खुलेआम इस्लामीक कट्टर वाद्याकडून हल्ले होत असून दिवसा ढवळ्या डोळ्या समोर अत्याचार केल्या जात आहेत. ही बाब अत्यंत चिंताजनक व दुर्दैवी असून बांगलादेशातील हिंदूंवर होणारे अमानुषीय अत्याचार त्वरीत थांबवावेत तसेच या अत्याचाराच्या विरोधात आत्मसंरक्षणासाठी लोकशाही मार्गाने उठवलेला आवाज सुद्धा हुकूमशाही पद्धतीने दाबून टाकल्या जात आहे. या अमानवीय, अमानुष अत्याचाराच्या विरोधात शांततापूर्ण आंदोलनात हिंदूचे नेतृत्व करणाऱ्या इस्कॉन साधू चिन्मय कृष्णदास यांना तुरुंगात डांबून बांगलादेशातील सरकार सुद्धा हिंदूवर एक प्रकारचा अन्याय करीत असल्याचे निदर्शनाला येत आहे.
तेव्हा या होणाऱ्या अन्याय व अत्याचाराच्या विरोधात सकल हिंदू समाज भोकरच्या वतीने दि.१० डिसेंबर रोजी भोकर बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत भोकर येथील सर्व व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच सकल हिंदू समाजाच्या वतीने बालाजी मंदिर भोकर येथून मोठ्या संख्येत मूक मोर्चा ची रॅली काढण्यात आली. या मुक मोर्चात महंत बालयोगी व्यंकट स्वामी महाराज पिंपळगाव मठ संस्थान, चैतन्य बापू महाराज कोंडलेश्वर आश्रम, साध्वी मुक्तानाथ, महंत कपाटे महाराज, उत्तम बन महाराज कैलास गड, अमरनाथ महाराज, चंद्रकांत महाराज, रवी महाराज राम मंदिर संस्थान भोकर आदींसह अनेक संत महंत मंडळी, महिला मंडळी व सकल हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदवली होटी. हा मुक मोर्चा डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे कोळी गल्ली, महादेव मंदिर, फुलेनगर बस स्टॅन्ड मार्गे तहसील कार्यालय येथे येऊन घटनेच्या निषेधार्थ सकल हिंदू समाज संघटनेच्या वतीने तहसीलदार भोकर यांच्या मार्फत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हे निवेदन पाठवण्यात आले आहे या निवेदनावर शंकर पसनुरवार
साईदास माळवंतकर, व्यंकट माने, सोहम शेट्टे, रमाकांत जोशी, संजय सोनाळे, आडेलू ताटीकुंटलवार, महेश चिंचबनकर, शिवदास चिंताकुटे, गीरीष लक्षटवार, निखील सिंगेवार, आकाश देशपांडे, प्रकाश मुदिराज या सह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
