मुंबई उच्च न्यायालयात पेन ड्राईव्ह बॉम्बच्या माध्यमातून एक मोठा दावा समोर आला आहे. महाविकास आघाडीच्या काळातील तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात एक मोठे षडयंत्र रचल्याचा आरोप तपास अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.
पेन ड्राईव्हमध्ये या संदर्भातील एक स्टिंग ऑपरेशन असलेला व्हिडिओ आहे, ज्यात फडणवीस आणि शिंदे यांना अडकवण्याचे आदेश देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. एसीपी पटेल यांनी या स्टिंग ऑपरेशनमध्ये हा गंभीर दावा केला आहे. यानंतर महाराष्ट्राच्या राजकरणात मोठी खळबळ उडाली. आज विधानसभेत देखील याचे पडसाद उमटले. या पेन ड्राईव्ह प्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी शिवसेना शिंदे गटाचे नेते शंभुराजे देसाई यांनी केली आहे.
शंभूराज देसाई म्हणाले, सभागृहामध्ये पेन ड्राईव्ह दाखवण्यात आला होता.त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अडकवण्याचा प्रयत्न कसा करण्यात आला तो विषय घेण्यात आला. सरकार म्हणून आमच स्पष्ट मत झालं. एसीपी दर्जाचा माणूस इतकं धाडस करू शकत नाही. याच्यामागे कोण आहे, सरकारच्या वतीने एसआयटी नेमण्याचं गठित केलं जाईल. चौकशीमध्ये जे दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाच्या मुळाशी सरकार जाणार आहे.
संजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा: प्रविण दरेकर
तर भाजप नेते प्रविण दरेकर म्हणाले, काल स्टिंग ऑपरेशन झालं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांना अडकवा असा स्टिंग ऑपरेशन झालं. अशा प्रकारचं काम डीसीपी लक्ष्मीकांत पांडेला दिलं गेलं. सूड भावनेने सरकारने वागू नये असे सांगत असताना महाविकास आघाडी सरकार असताना कशा सूड भावनेने वागले. फडणवीस विरोधी पक्षनेता असताना सरकार विरोधी भूमिका मांडत होते . मी चार मागण्या केल्या आहेत. यासाठीची नेमणूक करून चौकशी लावावी. डीसीपी लक्ष्मीकांत पाटील यांना तात्काळ निलंबित करून त्यांची चौकशी करावी. संजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा त्यांना अटक करावी, अशा मागण्या मी सभागृहात केले आहे.
विरोधक सूड भावनेने वागतात हे उघड झालं : प्रविण दरेकर
सरकारच्या वतीने शंभूराजे यांनी यासाठी चौकशी लावण्याची मागणी केली. शेखर जगताप यांना सरकारी पॅनलवरून कमी करणे . विरोधक सूड भावनेने वागत आहेत. विरोधक कसे सूडबुद्धीने वागतात हे आम्ही आज सभागृहात उघड केलं, असेही दरेकर म्हणाले.
