स्पोर्ट्स ते OTT प्लॅटफॉर्म इत्यादी कंटेंट पाहण्यासाठी स्मार्ट टीव्ही हा सर्वोत्तम ऑप्शन आहे. मोबाईल आणि लॅपटॉपच्या तुलनेत त्यांच्या स्क्रीन मोठ्या असतात आणि त्यांचा वापर घराची सजावट म्हणून करता येतो.
चांगली गोष्ट अशी आहे की, त्यांना खरेदी करण्यासाठी खूप पैसे खर्च करण्याची गरज नाही. तुमचे बजेट कमी असेल तर काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला अनेक कंपन्यांकडून 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत स्मार्ट टीव्ही मिळतील. आज आम्ही तुमच्यासाठी असेच काही पर्याय घेऊन आलो आहोत.
VW 80 cm (32 inches) Frameless Series HD Ready Android Smart LED TV
या स्मार्ट टीव्हीमध्ये HD रेडी (1366×768) रिझोल्यूशनचा डिस्प्ले आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात 1 HDMI आणि 2 USB पोर्ट आहेत. यात 20 वॅट्स साउंड आउटपुटसह पॉवर ऑडिओ आहे. स्मार्ट टीव्ही फीचर म्हणून, त्यात बिल्ट-इन वायफाय, स्क्रीन मिररिंग, पीसी कनेक्टिव्हिटी, वायरलेस हेडफोन कंट्रोल हे मिळतं. हा टीव्ही Amazon वर 7,499 रुपयांना एका वर्षाच्या वॉरंटीसह उपलब्ध आहे.
Acer 80 cm(32 inches) Advanced N Series Standard LED TV
HD (1366 x 768) रिझोल्यूशनसह येत असलेल्या, या स्मार्ट टीव्हीमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 3 HDMI आणि 2 USB पोर्ट आहेत. यात 24 वॅट्सचे साउंड आउटपुट आहे. फ्रेमलेस डिझाइनसह येत असलेल्या या टीव्हीमध्ये डिजिटल नॉइज रिडक्शन आहे. यावर एक वर्षाची वॉरंटी आहे आणि ती Amazon वर 8,499 रुपयांना विकली जात आहे.
Kodak 80 cm (32 inches) Special Edition Series HD Ready Smart LED TV
या स्मार्ट टीव्हीमध्ये 512 MB RAM आणि 4 GB ROM आहे. एचडी रेडी (1366 x 768) रिझोल्यूशन असलेल्या या टीव्हीमध्ये 30 Wattsचा साउंड आउटपुट आहे. यावर एक वर्षाची वॉरंटीही मिळते. तुम्ही ते Amazon वरून 8,499 रुपयांना खरेदी करू शकता. सध्या यावर 43 टक्के सूट दिली जात आहे.
