अभिनेत्री तेजश्री प्रधान ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेबरोबर वेगवेगळ्या विषयांवर आधारित असलेले चित्रपट करताना दिसत आहे. शुक्रवारी (दि.२०) तिचा नवा चित्रपट ‘हॅशटॅग तदेव लग्नम’ प्रदर्शित झाला आहे.
आनंद गोखले दिग्दर्शित ‘हॅशटॅग तदेव लग्नम’ चित्रपटात तेजश्री गायत्रीच्या भूमिकेत झळकली आहे.
या चित्रपटात तेजश्रीसह अभिनेता सुबोध भावे, शर्मिष्ठा राऊत, अर्चना निपाणकर, उदय नेने, संजय खापरे, प्रदीप वेलणकर अशी बरीच तगडी कलाकार मंडळी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. यानिमित्ताने प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना तेजश्रीने आपण पुन्हा विवाह करण्यास उत्सुक असून योग्य जोडाराच्या शोधात असल्याचे सांगितले आहे.
तेजश्रीला विचारले की, खऱ्या आयुष्यात तुला तुझ्या जोडीदारासाठी काय अटी आहेत? तुला कसा जोडीदार हवा आहे ? तर तेजश्री म्हणाली, अटी असतात. पण मला वाटते, अपेक्षांचे कसे आहे माहिती आहे का, एखादी पेन्सिल नवीन घेतो आणि त्याला शार्प करतो. तेव्हा ती खूप शार्प असते.
आपण त्याने खूप लिहितो आणि मग त्याचा शार्पनेस बोथट होऊन जातो. त्याचा शार्पनेस निघून जातो. तसे मला वाटते अनुभवाचे असते किंवा तुमच्या अपेक्षांचे असते. जसे तुमचे आयुष्य आणि वय पुढेपुढे जात असते, तेव्हा आपण १०० अटींवरून इथपर्यंत येतो की, एक सच्चा आणि खरा माणूस आपल्या आयुष्यात यावा.
याच्या पलीकडचे सगळे निभावले जाईलच. फक्त नात्यात खरेपणा असावा. आता इतकेच उरले आहे. ‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली तेजश्री सध्या ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत पाहायला मिळत आहे. या मालिकेतील तिने साकारलेली मुक्ता प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. तसेच तिच्या या मालिकेला टीआरपीही चांगला मिळत आहे.