दै.चालु वार्ता
अहमदपूर, प्रतिनिधी
हाणमंत जी.सोमवारे
लातूर (अहमदपूर) : राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे बुधवार, 25 डिसेंबर 2024 रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सहकार मंत्री ना. पाटील हे 25 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते 10.30 वाजेपर्यंत शिरूर ताजबंद येथील इंद्रायणी निवासस्थानी कार्यकर्त्यांच्या भेटी घेतील. सकाळी 11 वाजता अहमदपूर येथील संस्कृती फंक्शन हॉल येथे श्री. अब्दुल मजीद जहागीरदार यांच्या मुलीच्या लग्नानिमित सदिच्छा भेट देतील. सकाळी 11.15 वाजता अहमदपूर येथून लातूरकडे प्रयाण करतील.
सहकार मंत्री ना. पाटील हे दुपारी 12 वाजता लातूर येथील महाविहार धम्म केंद्र येथे सातवी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेला उपस्थित राहतील. दुपारी 1 वाजता लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील डीपीडीसी सभागृहात आयोजित सहकारातून समृद्धी कार्यक्रमास ते उपस्थित राहतील. सायंकाळी 5.15 वाजता लातूर येथून शिरूर ताजबंदकडे प्रयाण करतील. सायंकाळी 6 वाजता शिरूर ताजबंद येथील इंद्रायणी निवासस्थान येथे आगमन व राखीव. रात्री 9 वाजता शिरूर ताजबंद येथून लातूरकडे व लातूर येथून मुंबईकडे प्रयाण करतील.
