वाचा प्रेरणादायी प्रवा..!
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. मेहनतीशिवाय यश मिळत नाही. परंतु मेहनतीसोबतच तुमचा आत्मविश्वास खूप महत्त्वचा असतो. असाच आत्मविश्वास एन.अंबिका यांच्यासोबत झालं. एन. अंबिका यांचे १४ व्या वर्षी लग्न झाले.
त्यांना खूप कमी वयात मुलंदेखील झाली. परंतु दोन मुलांचे संगोपन करत त्यांनी यूपीएससी परीक्षा दिली. या काळात त्यांच्या पतीचे त्यांना खूप सहकार्य लाभले. (IPS N Ambika)
आयपीएस एन.अंबिका या तामिळनाडूच्या रहिवासी आहेत. त्यांचे खूप लहान वयात लग्न झाले. त्यांना १८ व्या वर्षी दोन मुली होत्या. परंतु मुली असतानाही त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यांचे पती कॉन्स्टेबल आहेत. त्यांनी एकदा प्रजासत्ताक दिनी दोन आयपीएस अधिकाऱ्यांना सलामी दिली. यामुळेच त्यांनी आयपीएस होण्याचा निर्णय घेतला. (IPS N Ambika Success Story)
अंबिका यांनी १०वीची परीक्षा दिली. त्यानंतर त्यांनी १२वीची परीक्षा दिली. यानंतर ग्रॅज्युएशन केले. त्यानंतर यूपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी त्या चेन्नईला गेल्या. त्यांच्या पतीने मुलांचा सांभाळ केले.
अंबिका यांना यूपीएससी परीक्षेत ३ वेळा अपयश आले. तेव्हा त्यांना परत घरी परतण्याचा सल्ला त्यांच्या पतीने दिला. परंतु त्यांनी आपले स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार केला. २००८ मध्ये चौथ्या प्रयत्नात त्यांनी यूपीएससी परीक्षा क्रॅक केली.त्यांचा हा प्रवास सर्वांनाच प्रेरणा देईल. (Success Story)
अंबिका यांचा बालविवाह झाला होता. १८ व्या वर्षी पदरात दोन मुले होती. तरीही आयुष्यात काहीतरी मोठं करण्याचे स्वप्न त्यांनी पाहिलं आणि ते पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत केली. त्यांना तीन प्रयत्नात अपयश आले तरीही त्यांनी चौथ्या वेळी पुन्हा प्रयत्न केले. यावेळी त्यांनी यश मिळाले.
