दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी वाशिम रिसोड -भागवत घुगे
रिसोड तालुक्यात मधमाशांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याने त्याचा परिणाम कांदा बिजोत्पदनावर होउन उत्पादनात मोठी घट होणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
कांदा बियाणांच्या उत्पादनासाठी मधमाशांद्वारे नैसर्गिक परागीकरण आवश्यक असते. यंदा तालुक्यात मधमाश्यांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याने परागीकरणाची समस्या निर्माण झाली आहे. परिणामी कांदा बियाणे उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत आहे तालुक्यातील रब्बीत लागवड केलेल्या कांदा बीजोत्पादनातून या वर्षी मधमाश्यांची संख्या कमी झाल्याने उत्पादन घटण्याची चिंता शेतकऱ्यांना भेडसावू लागली आहे. सध्या कांद्याचे हे पीक गेंदामध्ये बियाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. सध्याच्या काळात परपरागीभवनासाठी मधमाश्यांची नितांत आवश्यकता असताना पिकावर तुलनेने अत्यंत कमी प्रमाणात मधमाश्या फिरकत आहेत. या भागात रब्बी हंगामात कांदा बीज ोत्पादन घेण्याचे प्रमाण प्रामुख्याने असून रोख पैसे देणारे पीक म्हणून शेतकरी याकडे वळले होते. अनेकांनी कंपन्या शेतकऱ्यांना कांद्याच्या बियाण्याचा पुरवठा करतात. या बियाण्यांना ५० ते ६० हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळतो. यंदा मधमाश्यांअभावी परागीकरण कमी होत असल्याने उत्पादन घटण्याची भीती आहे. शासनाने शेतकऱ्यांना मधमाश्यांच्या पेट्या मोफत द्याव्यात .
राजकुमार गरकळ
शेतकरी मांडवा
या वर्षी पाण्याची समस्या असतानाही कांदा बीजोत्पादनात सातत्य टिकवून ठेवले. कांदा मधमाश्यांची बीजोत्पादनासाठी भूमिका मोठी असते. कीड व रोगांना प्रतिबंध घालण्यासाठी कीटकनाशक फवारणीचे प्रमाण वाढल्याने मधमाश्यांना हानी पोचत आहे. या वर्षी मधमाश्यांची संख्या कमी झालेली बघायला मिळत आहे. सध्या कांद्याच्या गेंदातील फुलांवर चिकटद्रव मोठ्या प्रमाणात असतानाही मधमाशा त्यावर फिरकत नसल्याचे शेतकरी सांगतात. गेल्या आठ-दहा दिवसांत हे प्रमाण वाढले
कांदा बीजोत्पादन पिकाची सध्या कुठे फुलोरा तर कुठे बियाणे भरण्याची अवस्था सुरूआहे. फुलांवर मकरंद (चिकटद्रव) असतानाही मधमाश्या तुलनेने अत्यंत कमी प्रमाणात दिसत आहेत. यातून परागीभवनाची प्रक्रिया रखडत चालली आहे. परिणामी, उत्पादनावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. –
विष्णूपंत कांयदे
मांडवा शेतकरी
……..
दिवसा कडक ऊन राहत असून आणि रात्रीला थंडीचा कडाका कायम आहे. हे बदललेले वातावरण यासाठी कारणीभूत मानले जात आहे. मागील दोन वर्षांपासून असा प्रकार वारंवार होत आहे. त्यामुळे उत्पादनावर थेट
परिणाम होत आहे. वातावरणातील असमतोल आणि कीटकनाशकांच्या वापरामुळे मधमाश्यांची संख्या घटली आहे. शेतकऱ्यांनी सकाळी आठपूर्वी कृत्रिम परागीकरणाचा प्रयोग करावा आणि शक्य असल्यास मधमाश्यांच्या पेट्या शेतात ठेवाव्यात असे तज्ञ शेतकऱ्यांकडुन सल्ला दिला जात आहे.
