दैनिक वार्ता प्रतिनिधी पिंपरी पिंपरी चिंचवड -धनाजी साठे
पिंपरी: दि.१८ मार्च रोजी पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड पिंपरी डेपो कडील मार्ग क्र १२० पिंपरी रोड ते म्हाळुंगे एंडूरान्स कंपनी या मार्गाचे उद्घाटन
सहव्यवस्थापकीय संचालक श्री नितीन नार्वेकर साहेब, ट्राफिक मॅनेजर श्री सतीश गव्हाणे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.
पिंपरी डेपोचे आगार व्यवस्थापक
श्री राजेश जाधव साहेब यांच्या देखरेखीखाली हा कार्यक्रम पार पडला.
पिंपरी रोड ते म्हाळुंगे एमआयडीसी बस सेवा सुरू केल्याने विद्यार्थी, कामगार,आबाल वृद्ध, यात्रेकरू,
तसेच चाकण एमआयडीसी मध्ये माळुंगे एमआयडीसी मध्ये कामासाठी जाणारे कामगारांसाठी ही आनंदाची बातमी आहे,धावपळीच्या काळात नेहरूनगर, बालाजी नगर, आसपासचा कामगार वर्गाला भोसरी येथून म्हाळुंगे एमआयडीसी जाण्यासाठी बस पकडावे लागत होती ती त्यांची धावपळ आणि दगदग कमी होईल हे प्रवासी वर्गाच्या आनंदातून दिसून येते. उद्घाटन सोहळ्याच्या प्रसंगी सहव्यवस्थापकीय संचालक श्री नार्वेकर साहेब यांनी उद्घाटन ठिकाणी जमलेल्या चालक आणि वाहक व कर्मचारी वर्गांना संबोधित केले. वाहतूक व्यवस्थापक श्री गव्हाणे साहेब यांनी देखील प्रवाशांची गैरसोय होऊ नये,
प्रवासी तक्रारी येणार नाही त्याची काळजी घेऊन काम करावे,
असे आदेश देखील वाहक चालक यांना सुचवण्यात आले.
पिंपरी आगाराचे व्यवस्थापक आणि हेडकॉटर २ चे प्रमुख श्री राजेश जाधव साहेब यांनी देखील या नवीन मार्गाच्या माध्यमातून प्रवाशांना चांगल्या प्रकारचा उपयोग आणि वेळेची बचत होऊ शकते दैनंदिन सर्व बसेस मार्गस्थ होतील असे आश्वासन देखील यांनी दिले.
उद्घाटन सोहळ्याच्या ठिकाणी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
