दैनिक चालु वार्ता डहाणू प्रतिनिधी -सुधीर घाटाळ
डहाणू तालुक्यातील कासा बिरसा मुंडा चौकात शिवसेनेच्या वतीने स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्या विधानांचा तीव्र निषेध करण्यात आला. शिवसेना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपार्ह, असभ्य आणि विषारी वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी ‘जोड़े मारो’ आंदोलन करत पोलिसांना निवेदन दिले आणि कामरावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
शिवसेना पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की लोकशाहीत मतभेद असू शकतात, परंतु लोकप्रिय नेत्यांचा अपमान सहन केला जाणार नाही. उपमुख्यमंत्री शिंदे महाराष्ट्राच्या विकासासाठी अहोरात्र मेहनत घेत असताना त्यांच्या विरोधात अश्लील भाषा वापरणे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान असल्याचे सांगण्यात आले. कुणाल कामराने तात्काळ जाहीर माफी मागावी, अशी शिवसेनेची मागणी आहे.
यावेळी शिवसेना डहाणू तालुका प्रमुख संतोष देशमुख, उप तालुका प्रमुख राजेश कासट, पालघर विधानसभा अध्यक्ष हितेश पाटील, कासा शहर प्रमुख रघुनाथ गायकवाड, युवा तालुका प्रमुख विनोद चौरे, युवा उप तालुका प्रमुख सुधीर घाटाळ, विभाग प्रमुख राजकुमार गिरी, एकनाथ सोनकळे, शाखा प्रमुख अतुल नाईक, युवा शाखा अध्यक्ष सुमित गिरी, माजी पंचायत समिती सदस्य सुभाष चौरे, संदीप मोर, अल्पेश कोरडा, गणेश गावित,करण घाटाळ यांच्यासह शिवसेना, युवासेना, महिला आघाडीचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
