दैनिक चालु वार्ता भोकर प्रतिनिधी-विजयकुमार चिंतावार
भोकर /नांदेड :- तालुक्यातील मौजे धारजणी येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिनांक ३० मार्च २०२५ ते दिनांक ६ एप्रिल २०२५ दरम्यान श्री हनुमान मंदिर परिसरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून त्यानिमित्त दुपारी १ ते ४ ह भ प गोविंद महाराज मुंडे परळी वैजनाथ यांच्या ओजस्वी वाणीतून संगीत शिव महापुराण कथा ज्ञान यज्ञांचे आयोजन करण्यात आले आहे तर दररोज रात्री मान्यवर संतांची हरिकीर्तने होणार आहेत.
या हरिनाम सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम खालील प्रमाणे असतील.सकाळी ४ ते ६ काकडा भजन व आरती,७ ते ११ श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पारायण,दुपारी १ ते ४ संगीत शिव महापुराण कथा ज्ञान यज्ञ,सायंकाळी६ ते ७:३० हरिपाठ व रात्री ९ ते ११ खालील मान्यवर संतांची हरिकीर्तने होतील.
दि.३० मार्च रविवार ह भ प परमेश्वर महाराज शहापूरकर,दि.३१ मार्च सोमवार ह भ प वैष्णव दीदी गौड सोनखेडकर,दि.१ एप्रिल मंगळवार हभप भाग्यश्रीताई मोहिते परभणीकर,दि.२ एप्रिल बुधवार ह भ प माधव महाराज वडगावे पांगरीकर,दि.३ एप्रिल गुरुवार हभप गोविंद महाराज मुंडे परळी वैजनाथ,दि.४ एप्रिल शुक्रवार ह भ प तुकाराम महाराज साखरे मंडगीकर,दि.५ एप्रिल शनिवार ह भ प शुभम महाराज लिपणे, दिनांक ६ एप्रिल २०२५ रोज रविवारी सकाळी ९ ते ११ भागवताचार्य ह भ प योगेश महाराज गवंडगावकर यांचे काल्याचे किर्तन होईल व नंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येईल.तरी परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या सर्व धार्मिक कार्यक्रमाचा आवर्जून लाभ घ्यावा असे आवाहन समस्त गावकरी मंडळी मौजे धारजणी ता.भोकर जि.नांदेड यांच्या वतीने करण्यात आले आहे.
