दैनिक चालु वार्ता वाशिम रिसोड प्रतिनिधी – भागवत घुगे
वाशिम:-माजी शिक्षकआमदार श्रीकांत देशपांडे साहेब यांनी वाशिम जिल्ह्यातील शिक्षकांचे प्रश्न सोडविले त्यांनी दिनांक 24 मार्च रोजी वाशिम मध्ये येऊन समाज कल्याण, शिक्षणाधिकारी कार्यालय, वेतन अधीक्षक या सर्व ठिकाणी भेटी दिल्या विशेषतः आश्रम शाळा मधील शिक्षकांचे दोन वर्षापासून रेंगाळलेले प्रश्न तात्काळ सोडविण्यासाठी श्रीकांत देशपांडे साहेब यांनी अधिकाऱ्यांना समोर बसून,बोलून प्रश्न सोडविले यावेळी जिल्ह्यातील विविध प्रवर्गातील माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक उपस्थित होते सर्वांनी आप -आपले प्रश्न लेखी स्वरुपात आणले होते सर्वच्या सर्व प्रश्न श्रीकांत देशपांडे साहेब यांनी सोडविण्याचा प्रयत्न केला यावेळी जिल्हाध्यक्ष रमेश आरू सर, सर्व तालुका अध्यक्ष आवर्जून उपस्थित होते एकंदरीत सर्वांनी हे अथक परिश्रम करून जी समस्या देशपांडे साहेब यांनी सोडविली यासाठी सर्वांनी समाधान व्यक्त केले
