म्हणाले, दुर्दैवाने काही लोक समाजात फूट…
कॉमेडिअन कुणाल कामरा यांच्या विडंबन गाण्यावरून राज्यासह देशात गदारोळ सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित असलेल्या या गाण्यावरून शिवसैनिक राज्यात प्रचंड आक्रमक झालेत.
विरोधकांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा पुढं करत, कुणाल कामरा याच्या समर्थन करत आहेत. या गदारोळात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उडी घेत प्रतिक्रिया दिली आहे.
योगी आदित्यनाथ यांना या वादाच्या पार्श्वभूमीवर प्रश्न विचारण्यात आल्यावर योगी आदित्यनाथ म्हणाले,अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर इतरांवर वैयक्तिक हल्ले करण्यासाठी केला जाऊ शकत नाही. पण दुर्दैवाने काही लोक समाजा आणखी फूट पाडण्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्यांला जन्मसिद्ध हक्क मानत आहेत. कुणालाही समाज तोडण्याची किंवा विशिष्ट व्यक्तीवर अशोभनीय टिप्पणी करण्याचा अधिकार नाही, असेही योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.
कॉमेडिअन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित विडंबनात्मक गाणं रचून ते शोमध्ये सादर केले. यावरून राज्यात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे (Shivsena) कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले असून, कुणाल कामरा याचा स्टुडिओची तोडफोड केली. तसेच कुणाल कामरा यांच्याविरोधात गुन्हा देखील दाखल झाला आहे. शिवसैनिकांनी कुणाल यांच्या स्टुडिओची केलेल्या तोडफोडप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात कुणाल कामरा यांच्याविरोधात कारवाईचे संकेत दिले आहेत. स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कोणालाही नाही. कुणाल कामराला महाराष्ट्रातील जनतेने 2024 मध्ये कोण गद्दार आणि कोण खुद्दार? हे दाखवून दिलं आहे.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची विरासत कोणाकडे गेली? हे जनतेने दाखवून दिलं आहे. कॉमेडी करा, पण अपमानित करण्याचं काम कोणी करत असेल तर हे सहन केलं जाणार नाही, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
