दैनिक चालु वार्ता उदगीर प्रतिनिधी-अविनाश देवकते
लातूर (उदगीर) :आतनूर (ता. जळकोट) येथील तिरू नदीवरील रखडलेल्या पुलाच्या कामाबाबत शिवसेनेच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या आमरण उपोषणाला यश आले असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने आंदोलनकर्त्यांच्या सर्व मागण्या लेखी स्वरूपात मान्य केल्या आहेत. यामुळे शिवसेनेच्या संघर्षशील नेतृत्वाला आणि स्थानिक जनतेच्या एकजुटीला मोठा विजय मिळाला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सौ. अल्का डाके मॅडम आणि उपकार्यकारी अभियंता सौ. शीतल वट्टे मॅडम यांच्या हस्ते लेखी पत्र देण्यात आले. यामध्ये दि. २६ जून २०२५ पासून पुलाचे काम सुरू करण्याचा निर्णय, तसेच पर्यायी पुलाच्या उंचीमध्ये वाढ करून १८ सिमेंट पाईप टाकून लांबी वाढवण्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
यानंतर शिवसेना उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल, डॉ. तानाजी चंदावार, शहरप्रमुख अनिल पंचाक्षरी, आणि कनिष्ठ अभियंता शिंदे यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना फळांचा ज्यूस देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली.
—
तालुकाप्रमुख मुक्तेश्वर पाटील यांचे ठाम नेतृत्व
या उपोषणाचे नेतृत्व शिवसेना तालुकाप्रमुख मुक्तेश्वर पाटील यांनी केले. गेल्या अनेक महिन्यांपासून पुलाचे काम रखडले होते. पावसाळ्यात नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. हा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी ठाम भूमिका घेत प्रशासनाच्या विरोधात शांततामय संघर्ष आरंभ केला.
—
उपस्थित मान्यवर आणि शिवसैनिकांची मोठी उपस्थिती
या उपोषणात शिवसेना तालुका संघटक अभंग मोहटे, RPI तालुका अध्यक्ष विनोद कांबळे, गुत्तेदार बंडू पाटील, गोविंद बारसुळे, नागनाथ धोंडीहिप्परगे, वामन दहीकांबळे, पो. पाटील मेवापूर, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष जलील अत्तार, रवी पांचाळ, अभिजित येवरे, आईनू महागामे, माधव सोमूसे, जैनोद्दीन आतार, ईश्वर कुलकर्णी, तुकाराम जलसे, आदित्य बोडेवर, साहिल शिकारे, तुकाराम वर्षेवाड, हबीब शेख, बाजीराव कापडे, गजानन स्वामी, शिवा कापडे, चंदू कापडे, मारोती बोडेवार, उमाकांत तेलंगे, इरफान कासार, देविदास घोडके, अभंग गव्हाणे, आणि आतनूर गावकरी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—
शिवसेनेच्या वरिष्ठ नेतृत्वाचे मार्गदर्शन
या आंदोलनाला यश मिळवून देण्यासाठी शिवसेना सचिव संजय मोरे, संपर्कप्रमुख अॅड. श्रीनिवास क्षीरसागर, जिल्हाप्रमुख अॅड. ब्रम्हाजी केंद्रे, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल, तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक बांधवांचे मोलाचे सहकार्य व पाठबळ लाभले.
________________________________________
सणसणीत बातमीची परिणामकारक दखल.
या लढ्याला दिशा मिळवून देण्यासाठी “दैनिक चालू वार्ता” वृत्तपत्राने मोठी भूमिका बजावली. या वृत्तपत्राने आंदोलनाच्या आवाजाला धार देत, प्रशासनाच्या अकार्यक्षमतेवर ठाम शब्दांत प्रकाश टाकला.
या संदर्भात तालुकाप्रमुख मुक्तेश्वर पाटील म्हणाले,
“दैनिक चालू वार्ता वृत्तपत्राने आमच्या आंदोलनाच्या आवाजाला माध्यमातून धार दिली. हे केवळ आंदोलनाचे नव्हे, तर पत्रकारितेचेही यश आहे.”
________________________________________
संघर्षातून यशाचा मार्ग
हे यश म्हणजे स्थानिक जनतेच्या प्रश्नांसाठी एकजुटीने दिलेला लढा, शिवसेनेच्या नेतृत्वाखालील निर्धार आणि माध्यमांनी उभा केलेला जनआवाज यांचे प्रत्यक्ष फलित आहे. आता हे काम वेळेत आणि दर्जेदार व्हावे, हीच नागरिकांची अपेक्षा आहे.
