दैनिक चालु वार्ता लोहा प्रतिनिधी-
झाडे लावा झाडे जगवा पर्यावरणाचा समतोल राखा हा संदेश शिक्षक सेनेच्या वतीने देत
शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात वृक्षारोपण प्रेरणा मास व वृक्ष संवर्धन अभियान राज्य्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार ज.मो.अभ्यंकर यांच्या संकल्पनेतून राबविला जात आहे या अभियानाची सुरुवात दि.27 जून लोहा शहर जि.नांदेड येथून केली आहे.
शिक्षक सेनेच्या ता.शाखा लोहा जि.नांदेड यांच्या वतीने कें.प्रा.शाळा ब्रँच लोहा येथे शिवसेनेचे स्वामी रामानंद विद्यापिठाचे सिनेट सदस्य नवनाथ रोहीदास चव्हाण,शिवसेना तालुका प्रमुख भिमराव पा.शिदे व उत्तर तालुका प्रमुख बालाजी गाडेकर,गटशिक्षणाधिकारी लोहा सतीश व्यवहारे, शिक्षण विस्तारधिकारी सरस्वती अंबलवाड यांच्या हस्ते चिंच, गुलमोहरा,पिंपळ आदी झाडांचे वृक्षारोपण करुन सुरुवात केली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षक सेनेचे राज्य उपाध्यक्ष विठुभाऊ चव्हाण होते.प्रमुख मान्यवर नवनाथ चव्हाण बोलतांना म्हणाले वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झाली आहे त्या मुळे पर्यावरणाचा होणारा र्हास त्याचे होणारे मानव जिवणावर अनिष्ट परिणाम त्या मुळे वृक्षरोपण उपक्रम खुप चांगला घेत आहोत आसे म्हणत त्यांनी शिक्षक सेनेचे अभिनंदन केले.या वेळी बोलतांना गटशिक्षणाधिकारी सतिश व्यवहारे जमिनीची धुप थांबवण्यासाठी व पाऊस व्यवस्थित पडण्यासाठी वृक्षलागवड करणे ही काळाजी गरज आहे निश्चितच हा चांगला राष्ट्रीय उपक्रम आहे अध्यक्षिय भाषणात बोलतांना राज्य उपाध्यक्ष विठुभाऊ चव्हाण यांनी शिक्षक सेनेचा हा समाजिक आगळा वेगळा उपक्रम आसून उध्दव साहेब हे स्वतःपर्यावरण प्रेमी आहेत आणि देशात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करणे गरजेचे आहे म्हणूनच राज्यात शिक्षक सेना 27 जून ते 27 जुलै वृक्षारोपन प्रेरणा मास व वृक्षसंर्वधन शिवमोहत्सव साजरा करणार आहे यावेळी केंद्रप्रमुख विठ्ठल आचणे सर,डी.आर.शिंदे सर,पांडूरंग मुंढे सर बी.वाय. चव्हाण,आर.जी.वाघमारे शिक्षक सेनेचे तालुकाध्यक्ष संभाजी पवार,लहू पंंदलवाड,काशिनाथ शिरसीकर,भुजंग वाघमारे,शुभाष राठोड,संभाजी केंद्रे,मेकाले सर,धनंजय पवार,अंकुश बोटवे,एन..एस.पुपलवाड एस.एन,सौ.,सौ वळसे मॅडम ऊपस्थित होते.
