दैनिक चालू वार्ता माळशिरस प्रतिनिधी – राजेंद्र पिसे
नातेपुते : रोहित चांगण यांनी शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला असून, यानिमित्ताने एक भव्य बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस शिवसेनेचे नेते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाला खासदार मा. चंद्रकांत खैरे साहेब, शिवसेना उपनेते मा. उद्धवजी कदम, सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख मा. अनिलजी कोकीळ, सोलापूर जिल्हा प्रमुख मा. संभाजी राजे शिंदे, उपजिल्हा प्रमुख मा. नामदेव नाना वाघमारे, माळशिरस तालुका अध्यक्ष संतोष भैया राऊत, तालुका संपर्कप्रमुख मा. कैलासजी कांदळगावकर, जिल्हा प्रमुख मा. अजयजी दासरे, तसेच युवासेनेचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी माळशिरस तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नातेपुते शहरप्रमुख सनी गवळी यांची उपस्थिती लक्षणीय होती.
