शिवसेनेला दिला इशारा; म्हणाले तर…
माजी केंद्रीय मंत्री, राज्याचे माझी मुख्यमंत्री आणि विद्यमान भाजपचे खासदार नारायण राणे यांच्यावर करण्यात आलेल्या धक्कादायक दाव्याने राज्यात खळबळ उडाली आहे.
शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनी, राणे हे असेच मोठे झालेले नाहीत. त्यांनी त्यासाठी मर्डरही केले आहेत, असं वादग्रस्त विधान होतं. यावरून आता सिंधुदुर्गमध्ये राजकारण चांगलेच तापलेलं असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी एकाच वेळी गोगावलेंचे कौतुक केलं आहे. तर शिवसेनेला इशाराही दिला आहे.
वैभव नाईक यांनी, गोगावले हे नेहमीच परखड बोलणारे आहेत. त्यांच्या पोटात एक आणि ओटावर एक असे नसते. ते जे पोटात आहे तेच बोलतात. गेली अनेक वर्षे ते विधानसभेचे सदस्य असून मी देखील त्यांच्याबरोबर सहकारी म्हणून काम केले आहे.
त्यामुळे ते जे बालले त्यात तथ्य आहे. राणेंनी आपली संघटना आतापर्यंत अशा प्रकारच्या दडपशाहीनेच वाढवलेली आहे. त्यामुळे राणेंचा इतिहास काय आहे हे सर्वांनाच माहित आहे. पण आता गोगावले बोलल्याने हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. गोगावले हे राज्याचे जबाबदार मंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला महत्व आहे.
पण मंत्री गोगावले यांनी ज्या पद्धतीने राणेंचे उदाहरण देताना कार्यकर्त्यांना संदेश दिला, त्यावरून आता एक प्रश्न पडत आहे. शिवसेना (एकनाथ शिंदे) वाढिसाठी जिल्ह्यातील विरोधकांना सपवण्याची भाषा तर ते करत नाहीत ना? कारण ते राणे स्टाईलनेच पक्ष वाढविण्याचा सल्ला देत आहेत. पण त्यांचा मनसुबा असा असेल तर शिवसेनाही (उद्धव ठाकरे) आपल्या स्टाईलने उत्तर देईल, असाही इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.
काय म्हणाले होते गोगावले?
गोगावले यांनी राणेंच्या सिंधुदुर्गात जावून मोठे विधान केले. राणें अंगावर केसीस घेतल्या, मर्डर, भानगडी झाल्या प्रसंगी जेलमध्ये गेले, भानगडी केल्या. ते असेच मोठे झालेले नाहीत, असे वादग्रस्त विधान केलं होते. ज्यावरून राजकारण तापले असून मंत्री नितेश राणे यांनी गोगावलेंना टोला लगावला आहे. तसेच त्यांना चहाला या तुमच्या ज्ञानात भर घातली जाईल, असेही म्हणत फटकारले होते.
