‘तो’ एक फोन कॉल आणि झाले गुजरातचे मुख्यमंत्री…
भारताने पंतप्रधान नरेंद्र यांचा आज म्हणजे 17 ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे. नरेंद्र मोदी 75 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांचा राजकीय प्रवास अनेकांसाठी उत्तम उदाहरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अशा नेत्यांमधील एक आहेत, ज्यांनी कधीच निवडणूक पराभव स्वीकारला नाही.
पण तुम्हाला माहिती आहे नरेंद्र मोदी यांची राजकारणात एन्ट्री कशी झाली? ते मुख्यमंत्री कसे झाले? तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल जाणून घेऊ…
नरेंद्र मोदी यांची राजकारणात कशी झाली एन्ट्री?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जन्म 17 सप्टेंबर 1950 गुजरातच्या वडनगर येथे झाला. त्यांनी गुजरात विद्यापीठातून राजकारणात एमए केलं. सुरुवातीच्या काळात नरेंद्र मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये (आरएसएस) काम करत होते. त्यांनी गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रादेशिक संघटक म्हणून देखील काम केलं. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी 1987 मध्ये राजकारणात प्रवेश केला. 1988 मध्ये ते गुजरात भाजपचे सरचिटणीस झाले. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी 1995 आणि 1998 मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या प्रचारात महत्त्वाची भूमिका बजावली. म्हणून गुजरातमध्ये भाजप सत्तेत आला.
याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण आडवाणी यांच्या सोमनाथपासून आयोध्या रथ यात्रा आणि मुरली मनोहर जोशी यांच्या कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत कार्यक्रमात देखील मुख्य भूमिका साकारली… त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांमध्ये पक्षाच्या संघटनेत सुधारणा करण्याची जबाबदारी स्वीकारली. 1998 मध्ये ते भाजपचे सरचिटणीस झाले.
कसे मुख्यमंत्री झाले नरेंद्र मोदी?
2001 मध्ये नरेंद्र मोदी दिल्लीत पक्षासाठी काम करत होते, तेव्हा वरिष्ठ कॅमेरामॅन गोपाळ बिष्ट यांच्या अंत्यसंस्कारात उपस्थित होते. तेव्हा विमान अपघातात माधनराव सिंधिया यांचं निधन झालं होतं आणि त्यांच्यासोसोबत प्राण गमावणाऱ्या पत्रकारांमध्ये बिष्ट देखील होते. तेव्हा नरेंद्र मोदींना तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा फोन आला.
अटलबिहारी वाजपेयी यांनी नरेंद्र मोदी यांना विचारलं, ‘भाई कहां हो?…’ तेव्हा नरेंद्र मोदी म्हणाले, ‘मी स्मशानभूमीत आहे…’. अटलजींनी उत्तर दिलं, “तुम्ही स्मशानात आहात, आता मी तुम्हाला काय सांगू?” त्यानंतर नरेंद्र मोदी त्या संध्याकाळी अटलजींना भेटण्यासाठी पंतप्रधानांच्या निवासस्थानी गेले. अटलजी म्हणाले, “दिल्लीने तुम्हाला खूप मोठं केलं आहे! तुम्ही गुजरातला परत जा!”
नरेंद्र मोदी यांची मुख्यमंत्री म्हणून कारकीर्द
नरेंद्र मोदी यांनी 7 ऑक्टोबर 2001 मध्ये वयाच्या 51 व्या वर्षी गुरजराच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नरेंद्र मोदी राज्याचे 14 वे मुख्यमंत्री होते. त्यानंतर तब्बल 14 वर्ष मोदी गुजरात मुख्यमंत्री राहिले…. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2002, 2007 आणि 2012 गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमताने विजय मिळवून दिला.
नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान म्हणून कारकीर्द
नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये लोकसभा निवडणुक लढवली. त्यांच्या नेतृत्वात भाजप बहुमताने विजयी झाला आणि नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. 1984 नंतर पहिल्यांदाच देशात एकाच पक्षाला बहुमत मिळाले. त्यानंतर त्यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला पूर्ण बहुमताने विजय मिळवून दिला.
त्यानंतर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत देखील नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपने एकट्याने 240 जागा जिंकल्या आणि एनडीएने बहुमताचा आकडा सहज ओलांडला आणि नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.
