ठाणे जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी ,विकी जाधव
कोपरखैरणे :- भारतीय राज्यघटना स्वीकारल्याच्या वर्धापनदिनानिमित्त दरवर्षी २६ जानेवारी रोजी संपूर्ण देशभर प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. २६ जानेवारी १९४९ रोजी भारताने संविधान स्वीकारले, तर २६ जानेवारी १९५० पासून ते अंमलात आले. याच दिवशी पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी २१ तोफांच्या सलामीसह भारताला संपूर्ण प्रजासत्ताक राष्ट्र घोषित केले. हा ऐतिहासिक दिवस देशभरात आनंद व देशभक्तीच्या वातावरणात साजरा केला जातो.
या अनुषंगाने कोपरखैरणे पोलीस स्टेशनमध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कोपरखैरणे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी पोलीस कर्मचारी तसेच उपस्थित नागरिकांना मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास घणसोली येथील सुप्रसिद्ध दळवी अकॅडमीचे विद्यार्थी-विद्यार्थिनी प्रजासत्ताक दिनानिमित्त विशेष उपस्थित होते. दळवी अकॅडमीमध्ये भावी पोलीस भरतीसाठी मार्गदर्शन व उत्कृष्ट प्रशिक्षण दिले जाते. आजवर १०० हून अधिक पोलीस घडविणाऱ्या या घणसोलीतील अकॅडमीची पोलीस दलासाठी महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
यावेळी उत्कृष्ट व कौतुकास्पद कामगिरी करणाऱ्या कोपरखैरणे पोलीस स्टेशनमधील पोलीस कर्मचाऱ्यांचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक गवळी यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला.
प्रजासत्ताक दिनाच्या या कार्यक्रमास पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासह कोपरखैरणे क्राईम रिपोर्टर विशाल जगताप, नवी मुंबई विभागाचे सिनिअर क्राईम रिपोर्टर गणेश धनवाडे, दळवी अकॅडमी (घणसोली) व राजनंदिनी महिला अकॅडमीचे संस्थापक प्रदीप दळवी, त्यांचे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


