दैनिक चालू वार्ता मराठवाडा उपसंपादक -ओंकार लव्हेकर
कंधार/नांदेड
कंधार शहर हे राजकीय दृष्ट्या फक्त विकास सोडून नुसत्या गप्पांचे शहर होऊन बसले आहे. कोणीही यावं आणि टिकली मारून जावं अशी सद्यस्थिती अवस्था झाली आहे. विकास शुन्य अर्थव्यवस्था व पावडर लावून आपली पोळी भाजून घेतात. पण विकास मात्र ‘जैसे थे ‘आहे.
कंधार शहराची रस्त्याची अवस्था पाहिली तर खड्ड्यात रस्ता ही रस्त्यात खड्डा असा प्रश्न होऊन पडला आहे. कोणी जर बाहेरून आले आणि शहराची अवस्था पाहिली तर नक्कीच तोंडात बोट घातल्याशिवाय राहणार नाही.
येथील राजकीय दृष्ट्या येथील नेते मनात आणले तर एका महिन्यात हे शहर अख्ख्या महाराष्ट्रात नंबर एकचे शहर करून दाखवतील यात शंका नाही. पण येथील अंतर्गत वाद व राजकीय द्वेष एवढा विकोपाला गेला आहे. की त्यांना शहराचे व तालुक्याचे काहीही देणे घेणे राहिले नाही.
येथील शहराचे गेल्या काही वर्षांमध्ये अतिक्रमण करण्यात आलेले दुकाने उध्वस्त झाली व त्यानंतर त्यांची कुटुंब ही उठल्या गेली. कोण जाणे शहराचे वैभव हे शब्दात व्यक्त करता येत नाही. पण शहरांमध्ये वेगवेगळी धार्मिक मंदिरे येथे आहे त्यामुळे राज्यातून पर राज्यातून येथे बहुतांशी मंडळी पर्यटन स्थळ व धार्मिक स्थळ म्हणून आपुलकीने भेट देतात. पण भेट दिल्यानंतर त्यांच्या मनात शहराच्या विकासासाठी खूपच वेगळे विचार निर्माण होतात.
खरे पाहिले तर, येथील जगतुंग समुद्र हे शहराचे वैभव वाढवितो. वेळ प्रसंगी खूप प्रमाणात आधारित देतो. त्यामुळे सहज मिळालेली वस्तू ही येथील तालुक्यातील लोकांना पचत नाही की काय? असा प्रश्न पडला आहे.
कारण सदरील जगतुंग समुद्राच्या बाजूस अगर जर नियोजन लावून कायद्यामध्ये बसून सर्वानुमते तलवामध्ये बोटिंग, व बाजूला भव्य गार्डन उभा जर केले. तर जे काही धार्मिक येतील व किल्ल्याला भेट देतील व इतर धार्मिक व पौराणिक वास्तूला भेट दिल्यानंतर त्याच तलावाच्या अर्थात समुद्राच्या बाजूस पर्यटकांना मस्त, स्वच्छ राहण्याची व्यवस्था करावी .म्हणजे स्वच्छ रस्ते व गार्डन त्यामुळे खूप मोठा रोजगार या ठिकाणी निर्माण होईल.
कारण हॉटेल, किराणा, रिक्षावाले लॉज वाले मेस वाले खरमुरे वाले व इतर अनेक छोटे मोठे उद्योग सुरू होतील.
व सदरील तळ्याच्या संपूर्ण बाजूने ते काटेरी कुंपण काढून पाळूच्या बाजूने इंजिनियर ची मदत घेऊन स्वच्छ असा पंधरा फूट रस्ता व त्याच्या बाजूने कठडे डिझाईनचे उभे करावेत.
व सदरील धार्मिक स्थळांना व पर्यटन स्थळांना सदरील गार्डनचे रस्ते व शहरात पक्का रस्ता संपूर्ण ठिकाणी जोडावा शहर स्वच्छ व सुटसुटीत कसे दिसतील याकडे जातीने लक्ष घालावे.
तर संपूर्ण शहरांमध्ये स्वच्छतेविषयी व जागोजागी होर्डिंग लावण्यात यावी.
शहरामध्ये दोन्ही बाजूने बाजूने बांधलेली दुकाने व वरील सांगितलेले भव्य असे गार्डन व तसेच जोडणारी हायवे ची रस्ते नुसता विचार करून पहा कंधार शहर कसे दिसेल.
कारण कंधार शहर हे स्वतःला विकसित शहर शौर्यवान शहर धडाडीचे शहर स्वतःला बदलून घेणारे शहर व येथील जनता जोपर्यंत साथ देणार नाही तोपर्यंत शहराला गतवैभव प्राप्त होईल की नाही असे अनेक जणांचे मत व्यक्त होत आहे.
