दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
=====================
अहमदपूर :- दिनांक 18 सप्टेंबर 2022 मौजे ढाळेगाव तालुका अहमदपूर येथे डेंग्यू या आजाराचे अनेक रुग्ण आढळले असून अनेक रुग्ण लातूर येथे उपचारासाठी दाखल झाले असल्याचे दिसत आहे. डेंग्यू मलेरिया इत्यादी आजार हे पावसाळा आला की दरवर्षी होताना दिसून येतात मात्र यावर्षी ढाळेगावात अनेक रुग्ण हे डेंगूच्या तापाने फणफणत असून नातेवाईक इलाजास्तव खाजगी रुग्णालयात धाव घेताना दिसून येत आहेत. गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला या संदर्भात चौकशी केली असता उपकेंद्रातील डॉक्टर यांनी सांगितले की बहुतेक नातेवाईक हे खाजगी रुग्णालयात जाऊन उपचार घेत आहेत. व खाजगी लॅब मध्ये तपासणी करून पुढील उपचारासाठी लातूर येथे जात आहेत, त्यामुळे नेमका आजारी रुग्णांचा आकडा सांगता येणार नाही परंतु आरोग्य उपकेंद्र मार्फत उपायोजना सुरू असून घरोघरी जाऊन बँटिंग व तपासण्या व पाण्यातील अंडी नष्ट करण्यासाठी वापरण्यात येणारे औषध टाकण्यात येत आहे. ग्रामपंचायत कार्यालयाकडून अद्याप कोणत्याही उपाययोजना राबविल्या जात नसून गावात सर्वत्र घाण, कचरा व तुंबलेल्या नाल्या आढळून येत आहेत अद्याप गावात धूर फवारणी केलेली नाही ग्रामपंचायत कार्यालयाने वेळेत उपायोजना नाही राबविल्यास किंवा स्वच्छतेच्या बाबतीत गंभीरता नाही दाखवल्यास या आजाराचे प्रमाण अधिक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही
