दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा तालुक्यातील पिंपळगाव ढगे येथील सेवा सहकारी सोसायटीवर भाई किशनराव पाटील ढगे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सेवा सहकारी सोसायटी निवडणूकीत एकूण तेरा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. त्यापैकी निवडणूकीत १३ पैकी १३ उमेदवार निवडून आणुन विजयी करण्यात भाई किशनराव पाटील यांना यश मिळाले आहे.
सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक लढवण्यासाठी कौसल्ये आप्पाराव पुंडलिक, ढगे किशन संभाजी, ढगे प्रभाकर मारोती, ढगे बापूराव बाबाराव, ढगे बालाजी शिवाजी, ढगे विठ्ठल मारोती, ढगे गंगाबाई मारोती, ढगे भागीरथाबई माणिका, नरवाडे शामराव मूंजाजी, लालवंडे दागडोबा फालाजी, डूबुकवड रेशमाजी काळबा,जोंधळे मधुकर सटवा, बावनपल्ले शिवलिंग भीमराव आदी उमेदवार निवडणूक रिंगणात होते. वरील सर्व उमेदवार भरघोस मतांनी निवडून आणण्यात भाई किशनराव पाटील ढगे यांना यश मिळाले असुन या निवडणुकीच्या निकालाचा तालुक्याभरात चांगलाच बोलबाला कानी ऐकायला मिळत आहे विशेषतः सलग ९ वर्षांपासून सेवा सोसायटीवर भाई किशनराव पाटील ढगे यांना निवडणूक लढवतानायश मिळाले आहे . सेवा सोसायटीचा निकाल लागताच मारोतराव पा बोरगांवकर शरद पा बोरगांवकर , विजय पा जामगे आदिनी सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा सम्मान व सत्कार यावेळी केला व तालुकाभरातुन शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
सदरील निवडणुकीचा निकाल लागताच लोहा कंधारचे माजी आमदार रोहिदास चव्हाण यांनी आपल्या निवासस्थानी सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
