दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी – नवनाथ यादव
भूम:- शहरात सध्या वाढती लोकसंख्या,वाहनांची संख्या वाढलेली दिसून येत आहे.त्यामुळे प्रमुख रस्त्यावर सध्या गतिरोधकाची आवश्यकता भासत आहे. त्यामुळे प्रमुख मार्गावर गतिरोधक बसवण्याची मागणी सर्व पक्षांनी केले आहे. सविस्तर वृत्त असे की या निवेदनात असे म्हटले आहे की, गतिरोधक नसल्यामुळे वाहनचालक बेदरकारपणे गाडी चालवताना शहरात दिसत आहेत. असाच प्रकार दि. 4 3 2023 रोजी शहरातील बागवान गल्लीत एका चार वर्षाच्या मुलीचा भरधाव वाहनाने चिरडून मृत्यू झाला होता. या घटनेने भूम शहरात दुःखाचे वातावरण निर्माण झाले होते. या मार्गावर जर गतिरोधक असता तर होणारा अपघात टाळला असता असे बागवान गल्लीतील नागरिकांचे मत होते शहरात गतिरोधक बसवा अशी वेळोवेळी मागणी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी केलेली होती. पण याकडे नगरपालिकेने दुर्लक्ष केले या घटनेनंतर भूम शहरात नागरिकांनी स्वतः रस्त्या खोदून त्यात स्वखर्चाने गतिरोधके तयार केलेली आहेत. याबाबत आज सर्वपक्षीय नेत्यांनी मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांची भेट घेतली व तात्काळ भूम शहरात जिथे वाहनांची वर्दळ आहे त्या ठिकाणी गतिरोधक बसवावे अशी निवेदनाद्वारे विनंती केली आहे. जर आठ दिवसात गतिरोधक बनवण्यात आले नाहीत तर सर्वपक्षीय पदाधिकारी स्वतः जेसीपी घेऊन शहरातील प्रमुख मार्गावर जिथे गतिरोधकाची गरज आहे तिथे गतिरोधक बनवणार असल्याचे त्यांनी कळवले आहे. या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आबासाहेब मस्कर ,काँग्रेस आय तालुका अध्यक्ष रुपेश आप्पा शेंडगे ,काँग्रेस नेते विलास शाळू,भाजपा सरचिटणीस संतोष सुपेकर, अल्पसंख्यांक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आखतर जमादार ,युवा नेते राजूभाऊ माने, शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस विनोद नाईकवाडी, मागासवर्गीय राष्ट्रवादी सेलचे तालुका अध्यक्ष गणेश साठे, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष साद भाई शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अमोल सुरवसे,
सचिन बारगजे, भाजप शहर अध्यक्ष शंकर खामकर, महादेव शेंडगे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
