दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
लातूर/अहमदपूर:- अहमदपूर तालुक्यातील किनगांव येथील महात्मा फुले वरिष्ठ महाविद्यालयात एक दिवशीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन अर्थशास्त्र विभागाच्या वतीने कृषी क्षेत्रासमोरील आव्हाने या विषयावर शनिवार दि १८ मार्च २०२३ रोजी सकाळी ठिक ११ वाजता ऑनलाईन संपन्न होणार आहे
या राष्ट्रीय चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी श्री छञपती शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव तथा प्राचार्य डॉ बबनराव बोडके राहणार आहेत तर या राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन नांदेड च्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य तथा व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा डॉ अशोक टिपरसे यांच्या शुभहस्ते , मार्गदर्शनाने संपन्न होणार आहे तर प्रमुख पाहुणे तथा बीजभाषक डॉ हरिसिंग गौर विद्यापीठ सागर (मध्यप्रदेश )च्या मानव्यविद्या व सामाजिक शास्ञ संकुल च्या अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा डॉ विना ठावरे चौरासे *कृषी क्षेत्रासमोरील आव्हाने* या विषयावर व्याख्यान देणार आहेत यावेळी नांदेड जिल्ह्यातीललोहा येथील संत गाडगे महाराज महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. नामदेवराव मुंढे *भरड धान्य उत्पादन शाश्वत कृषी विकासाचे एक साधन* या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत या ऑनलाइन राष्ट्रीय चर्चासत्रात प्राध्यापक, अर्थतज्ज्ञ, विषयतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते , विद्यार्थी- विद्यार्थिनी यांना सहभागी होण्याचे आवाहन संयोजक तथा अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा बालाजी आचार्य , अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा डॉ प्रभाकर स्वामी , व उपप्राचार्य डॉ विठ्ठल चव्हाण यांनी केले आहे हे राष्ट्रीय चर्चासञ यशस्वी होण्यासाठी प्रा सदाशीव वरवटे , प्रा संजय जगताप , प्रा डॉ बळीराम पवार , प्रा पाडूरंग कांबळे, प्रा डॉ भारत भदाडे , प्रा डॉ अनंत सोमवंशी, प्रा डॉ विरनाथ हुमनाबादे, प्रा डॉ दर्शना कानवटे , प्रा अजय फड , प्रा चेतन मुंढे , गोपाळ इंद्राळे, उद्धवराव जाधव , कु पुजा सिरसाठ , कु वैष्णवी गुजे , कु ऐश्वर्या साखरे ,कु शुभम कांबळे ,कु रामेश्वर नागरगोजे आदि परिश्रम घेत आहेत
