दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:लोहगाव ता. बिलोली येथील शेतकरी रामेश्वर माधवराव शेटकर यांच्या शेतात तायर झालेला गहू कापणी करून जमा करून ठेवलेल्या गव्हाच्या गंजीला मंगळवार दि. १४ मार्चला रात्री नऊ वाजताच्या सुमारास कोणीतरी अज्ञात इसमाने हा ढिगच पेटवून दिला. कापलेल्या गव्हाच्या पेंढ्या काही क्षणात जाळून खाक झाल्या. यामुळे शेतकरी रामेश्वर माधवराव शेटकर यांचे पंचेचाळीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेबाबत शेटकर यांनी रामतीर्थ पोलिसात रीतसर तक्रार दाखल केली आहे.लोहगाव ता. बिलोली येथील अल्पभूधारक शेतकरी रामेश्वर माधवराव शेटकर यांनी आपल्या शेतातील काढणी योग्य व तयार झालेल्या गव्हाच्या पिकाच्या पेंढ्या आपल्या गट नं.१२ मध्ये शेतात एका जागेवर रचून ठेवल्या होत्या. कोणीतरी अज्ञात इसमाने शेटकर यांचे नुकसान करण्याच्या उद्देशाने शेतात जमा करून ठेवलेल्या गव्हाच्या पेंढया कशानेतरी पेटवुन देवुन त्यांच्या गव्हाचे सुमारे ४५ हजार रुपयांचे नुकसान केलेली आहे.
याबाबत शेतकरी रामेश्वर शेटकर यांनी रामतीर्थ पोलिसांत रीतसर तक्रार दाखल केली आहे. या घटनेबाबत रामतीर्थ पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संकेत दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहेत. सदरील गव्हाच्या जळीत गंजीचा तहसील प्रशासनाने पंचनामा करुन झालेल्या नुकसानीचा शासकीय सानुग्रह अनुदान देण्यात यावे अशी मागणी तहसील बिलोली यांच्या कडे शेतकरी रामेश्वर माधवराव शेटकर यांनी केली आहे.
