दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) :-
जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती,पंचायत समिती व ग्रामीण रुग्णालय अंजनगाव सुर्जी च्या संयुक्त विद्यमाने आज २८ मार्च रोजी अंजनगाव सुर्जी ग्रामीण रुग्णालयात दिव्यांग तपासणी शिबिराचे आयोजन व प्रमाणपत्राचे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.स्थानिक ग्रामीण रुग्णालयात दिव्यांग तपासणी शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला असून शहर व ग्रामीण भागातील दिव्यांग सदर शिबिराला तपासणी करिता उपस्थित होते.
सदर दिव्यांग तपासणी शिबिरात अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.या दिव्यांग आरोग्य शिबिरामध्ये सर्व वैद्यकीय अधिकारी डॉ.चिन्मय बुर्जक,फिजिशियन,डॉ.शशिकांत फसाटे,डॉ.अभिजीत चारथळ,अस्थिव्यंग तज्ञ डॉ.गुरुप्रकाश खोब्रागडे,डॉ.स्वाती सोनोने (मनोविकार तज्ञ) डॉ.दीप्ती हरले मनोविकार तज्ञ,प्रमोद भकते (मानसिक विभाग दिव्यांग विभाग) अजय सोळंके,सामाजिक सेवा अधीक्षक,कविता सोळंके फिजीओ थेरपीस्ट,डॉ.मुनाल इरले,भावना पुरोहित आणि श्रद्धा हरकंचे (चिकित्सालयीन मानसशास्त्र),अमोल भातकुलकर,सचिन टवलारे ,सुशांत बडगे (ईं .एन. टी विभाग) निलेश ढेगंळे,वैभव काठोळे,अंजनगाव सुर्जी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विनोद खेडकर,वैद्यकीय अधीक्षक डॉ.अमोल नालट,तालुका वैद्यकीय अधिकारी सुधीर डोंगरे,डॉ.तरुण पटेल,डॉ.साकिब,संदीप पाटील,अजय थेडे,चोरपगार,अमोल राऊत,धोटे,विशाल हंतोडकर,ग्रामीण रुग्णातील कर्मचारी यांच्यासह पंचायत समिती मधील कर्मचारी,शिक्षक सहभागी झाले होते.
शिबिरात दिव्यांगांच्या ऑनलाईन नोंदणी,तपासणी,दिव्यांगाचे प्रमाणपत्र इत्यादी कार्यक्रम शिबिरात आयोजित करण्यात आले होते.शिबिराला दिव्यांगांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता.सदर शिबिराचे नियोजन अंजनगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विनोद खेडकर,वैद्यकीय अधीक्षक प्रमोद नालट,तालुका वैद्यकीय अधिकारी सुधीर डोंगरे,प्रमोद भकते दिव्यांग विभाग सामान्य रुग्णालय अमरावती यांनी केले.दिव्यांग बांधवांनी सदर तपासणी शिबिराचा लाभ घेतला.
