दैनिक चालु वार्ता चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी- दीपक कटकोजवार
चेन्नईत झालेल्या स्पर्धेमध्ये विदर्भातील आदित्य कुमार शिंगाडे याने प्रथम पुरस्कार प्राप्त करत यश संपादन केलं.
नागपूर स्थित वैनगंगा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट नागपूर येथील विद्यार्थी आदित्य शिंगाडे यांने चेन्नईत झालेल्या सी.इ. डी.अन्ना युनिव्हर्सिटी मध्ये प्रथम पुरस्कार प्राप्त केले. याकरिता याचा श्रेय त्यांनी आई-वडील व संस्थेचे अध्यक्ष ब्रह्मानंद कर्नजेकर, डायरेक्टर डॉ.भरत चेडे, डॉ.स्नेहल अभ्यंकर विभाग प्रमुख, डॉ.जानवी राठी, वाईस प्रिन्सिपल प्रफुल पुरी, प्रो.गौरव हिंगवे, प्रो. कोमल भंडारकर, प्रो.दिव्या मडावी, यांना दिले.
