दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:. देगलूर तालुक्यातील क्षिरसमुद्र येथील पोट निवडणूकीत ग्राम विकास पॅनलचा दणदणीत विजय झाला.क्षिरसमुद्र येथील पोट निवडणूकीत एकूण 448 मतदान झाले असून त्यात 306 मतदान ग्राम विकास पॅनला मिळाळे .या मध्ये वार्ड क्रं 1 मध्ये मारोती मोगलेपोल यांना 124 मतांनी विजयी झाले व.वार्ड क्रं 2 मध्ये इंदुमती यादव धनुरे यांना 105 मतानी विजयी झाले.व वार्ड क्रं 3 मध्ये ज्ञानेश्वर खिरे यांना 77 मते पडुन विजयी झाले.ग्राम विकास पॅनलचे प्रमुख मच्छिंद्र मारोतराव बिरादार,महारुद्र आप्पा, चंद्रकांत खिरे, अरविंद खिरे, सुरेश पाटील, सुर्यकांत देशमुख, दिनेश पांचाळ, बळीराम धनुरे व प्रशांत बाबाराव देशमुख यांनी अहोरात्र प्रयत्न करून यांच्या नेतृत्वाखाली ग्राम विकास .पॅनलचे दणदणीत विजय झाला आहे. यांच्या या विजयामुळे क्षिरसमुद्र गावातील नागरिकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.
