दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी-शिवकुमार बिरादार
मुखेड तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी घडवणारी शाळा म्हणून नावलौकिक मिळवलेल्या जिजाऊ ज्ञानमंदिर सेमी इंग्लिश स्कूल मुखेड चा श्रेया इंटेलिजंट अकॅडमी सर्च परीक्षा अंतर्गत संपूर्ण राज्यात घेण्यात येणाऱ्या श्रेया IAS स्पर्धा परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून या परीक्षेत इयत्ता दुसरीतील विद्यार्थी आदित्य जयसिंग देवकत्ते याने 100 पैकी 100 गुण घेऊन राज्यातून पहिला आला आहे. या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक ज्ञानोबा जोगदंड, सचिव जगदीश जोगदंड, मुख्याध्यापक जगदीप जोगदंड, पर्यवेक्षक सुधाकर जोगदंड यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक व अभिनंदन केले आहे.
