दैनिक चालु वार्ता छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधि -अन्वर कादरी
‘शासन आपल्या दारी’अभियानाच्या माध्यमातून सर्व विभागांना एकाच छताखाली आणून गरजूंना योजनांचा लाभ मिळवून देणे या उपक्रमाद्वारे साध्य होणार आहे. या माध्यमातून अधिकाऱ्यांना थेट नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेऊन तत्काळ निराकरण करणे शक्य होणार आहे. लाभार्थ्यांना कार्यकमाच्या ठिकाणी घेवून येण्यासाठी गावनिहाय नियोजन करताना व्यवस्थेबाबत कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याबाबत दक्षता घ्या, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी पाण्डेय, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीना यांनीही कार्य्रकमाच्या आयोजनाबाबत माहिती दिली. यावेळी विविध विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी आपल्या विभागाचे नियोजन सादर केले. यावेळी सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
