दैनिक चालू वार्ता वैजापूर प्रतिनिधी- भारत सोनवणे
वैजापूर -महसुल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी दि.२० मे शनिवारी वैजापूर येथे तहसिल कार्यालय नविन इमारत बांधकाम भुमीपूजन केले ते म्हनाले की,३० जुनपर्यंत शेतरस्ते, शिवरस्त्यांची कामे न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले. याप्रसंगी केंद्रीय मंत्री डॉ भागवत कराड साहेब यांनी उपस्थित राहून संबोधित केले. नवीन तहसील इमारत निर्माण झाल्यामुळे नागरी सेवा सुविधा मिळणे सुलभ होणार आहे असे या वेळी आवर्जून सांगितले. यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष मा.श्री.हरिभाऊ (नाना) बागडे जी,वैजापूरचे आमदार मा.प्रा.रमेश बोरनारे सर, जिल्हाधिकारी श्री. आस्तिककुमार पांडेय जी,पोलीस अधीक्षक (ग्रामीण) श्री.मनीष कलवानिया जी,प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्री.एकनाथ जाधव जी,माजी नगराध्यक्ष श्री.दिनेश परदेशी जी,तालुका अध्यक्ष श्री.कल्याण दांगोडे जी व मांन्यवराची उपस्थिती होती.
