दैनिक चालु वार्ता चंद्रपूर जिल्हा उपसंपादक -दीपक कटकोजवार
कापूस उद्योगाला पॅकेज द्या -विजय जावंधिया
दैनिक चालु वार्ता चंद्रपूर जिल्हा उपसंपादक दीपक कटकोजवार
सध्या कापसाला हमीभाव नाही ,जिनिंग मध्ये रुईच्या गाठी पडल्या आहेत तर गिरण्यांमध्ये कापसाचा धागा पडला आहे यामुळे कापूस पीक धोक्यात आले असुन केंद्र सरकारने तात्काळ कापसाचा हमीभाव कमीत कमी ९००० रुपये प्रति क्विंटल करावा व केंद्र सरकारने ५० लाख खंडी रुई ७० हजारच्या दराने बाजारातून विकत घेऊन अनुदान देऊन निर्यात केल्यास भारतातील कापसाची मंदी दूर होऊ शकते नाहीतर पुढच्या वर्षीही कापूस उत्पादक शेतकरी प्रचंड आर्थीक संकटात येतील तरी केंद्र सरकारने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकरी नेते विजय जावंधीया पांढरकवडा येथील शेतकऱ्यांच्या कापसाची होळी या सत्ताग्रहात केली .पांढरकवडा येथील तहसील चौकात आज शेकडो शेतकऱ्यांनी कापसाची होळी करून कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा सरकार दरबारी मांडल्या
आजच्या कार्यक्रमाला शेतकरी नेते किशोर तिवारी ,मोहन मामीडवार, जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष मुबारक तवर, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमर पाटील, पांढरकवडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रेम राठोड ,घाटंजी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मोरेश्वर वातीले ,जगदंबा देवस्थानचे माजी अध्यक्ष दीपक अण्णा कापर्तीवार ,पांढरकवडा खरेदी विक्री समितीचे संचालक प्रशांत बोंडे ,अभय कट्टेवार ,अजय राजुरकर, प्रेम चव्हाण ,बाळासाहेब जाधव ,देवानंद चन्नावार, रमेश चव्हाण ,सुधाकर गोवणे, विलास गोडे ,सुनील राऊत ,मनोज भोयर ,विष्णू राठोड, तुकाराम आत्राम यांनी यावेळी विचार मांडले .
यावेळी बोलतांना किशोर तिवारी यांनी ज्याप्रकारे महाराष्ट्रात आर्थिक अडचणीत आलेले कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करीत आहे मात्र एकीकडे अडचणीत आल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ४० टक्के अनुदान प्रति क्विंटल दिले आहे मात्र महाराष्ट्राचे कृषी विकासाला चालना देणारे एकमेव प्रमुख नागडी पीक कापसाचे भाव १४ हजार रुपये प्रति क्विंटल वरून ७ हजार रुपये प्रति क्विंटल आल्यानंतरही केंद्र सरकार व राज्य सरकारने महाराष्ट्रातील ८० लाख कापूस उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे या शेतकऱ्यांच्या गंभीर समस्येकडे लक्ष न दिल्यास मोठया प्रमाणात कापूस उत्पादकांच्या आत्महत्या सत्र सुरु होईल तरी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना खरीप हंगाम पुर्वी आर्थिक मदतीचे पॅकेज द्यावे ही मागणी यावेळी केली.
*महाराष्ट्रातील ८० लाखावर शेतकरी प्रचंड आर्थीक संकटात*
मागील वर्षी कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव मिळाल्यामुळे यावर्षी विक्रमी १ कोटी १२ लाख हेक्टर मध्ये कापसाची लागवड करण्यात आली. त्यामध्ये संपूर्ण विदर्भ मराठवाडा खांदेश उत्तर महाराष्ट्र सह मोठ्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रात पेरा करण्यात आला होता. सुरवातीला प्रचंड पाऊसाने कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले व ७० टक्के पीक सुद्धा नासले मात्र महाराष्ट्रातील ८० लाखावर शेतकरी प्रचंड वाढलेला लागवडीचा खर्च लाऊन जेमतेम ३० ते ४० टक्के कापसाचे उत्त्पन्न घेतले व मागील डिसेम्बरपासून कापसाचे भाव वाढतील या आशेने सर्व कापूस घरी ठेवुन कापसाचे भाव वाढतील या आशेने वाट पाहत आहे. आतातर कापसाचा भाव जेमतेम ७५०० रुपयावर अटकला आहे. मात्र महाराष्ट्रातील एकमेव नगदी पीक कापसाची दाणादाण ही केंद्र सरकारच्या कापूस उत्पादक शेतकरी विरोधी धोरणामुळे असुन महाराष्ट्राचे मिंधे सरकार सुद्धा या गंभीर विषयावर मौन घेऊन असल्यामुळे येत्या १८ मे ला हजारो केंद्र सरकारने कापूस निर्यात करण्यासाठी प्रति गाढी मागे ३०,००० /- अनुदान जाहीर करावे व शिन्दे सरकारने महाराष्ट्रातील ८० लाखावर कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ५ हजार रुपये अनुदान जाहीर करावे ही मागणी साठी शेतकरी चळवळीचे कार्यकतें अंकित नैताम यांनी यावेळी दिली .
