टीम इंडियाने अंडर 19 आशिया कप 2024 स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. टीम इंडियाने श्रीलंकेचा 7 विकेट्सने धुव्वा उडवला आहे. श्रीलंकेने टीम इंडियाला विजयासाठी 174 धावांचं आव्हान दिलं होतं.
भारताने हे आव्हान अवघ्या 3 विकेट्सच्या मोबदल्यात 21.4 ओव्हरमध्ये सहज पूर्ण केलं. टीम इंडियाने 175 धावा केल्या. वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे या सलामी जोडीने सर्वाधिक धावा करत इंडियाला चांगली सुरुवात करुन दिली आणि विजयाचा पाया रचला. तर त्यानंतर आंद्रे सिद्धार्थ सी, कॅप्टन मोहम्मद अमान आणि केपी कार्तिकेय निर्णायक खेळी करुन भारताला विजयी केलं.
अंडर 19 श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : विहास थेवमिका (कर्णधार), पुलिंदू परेरा, दुल्निथ सिगेरा, शरुजन षणमुगनाथन (विकेटकीपर), विमथ दिनसारा, लक्विन अबेसिंघे, कविजा गमागे, विरण चामुदिथा, प्रवीण मनीषा, न्यूटन रंजित कुमार आणि मत्थुस.
अंडर 19 इंडिया प्लेइंग इलेव्हन : मोहम्मद अमान (कर्णधार), आयुष म्हात्रे, वैभव सूर्यवंशी, आंद्रे सिद्धार्थ सी, केपी कार्तिकेय, निखिल कुमार, हरवंश सिंग (विकेटकीपर), किरण चोरमले, हार्दिक राज, चेतन शर्मा आणि युधाजित गुहा.
