सौरव गांगुली करणार BIG BOSS चे होस्टींग; तब्बल 125 कोटींची डिल.
भारताचा माजी कर्णधार आणि उत्तुंग षटकार ठोकणारा डावखुरा आक्रमक फलंदाज सौरव गांगुली याने क्रिकेटनंतर मनोरंजन विश्वात आपले नाव कमावले. त्यानंतर आता तो एक मोठी मजल मारण्याच्या तयारीत आहे.
बंगाली टीव्ही शो ‘दादागिरी’ ची लोकप्रियता चांगलीच दिसून आली. यानंतर गांगुलीने अनेक जाहीराती केल्या आहेत.
क्रिकेटनंतर आता मनोरंजन विश्वात सौरव गांगुली नाव कमवत आहे. मनोरंजन विश्वात त्याची याआधी छान झलक रसिकांना पाहायला मिळाली, त्यानंतर आता तो बिग बाॅसमध्ये होस्टींग करु शकतो. ‘बिग बॉस’ हा टीव्हीवरील लोकप्रिय रिॲलिटी शो आहे. आतापर्यंत अनेक प्रादेशिक भाषांमध्ये हा शो प्रसारित झालेला आहे.
बंगाली ‘रियलिटी शो’चे अँकरींग सोडले
सौरव गांगुलीने बिगबाॅससोबत करार करण्याआधी त्याचा बंगाली रिॲलिटी शो ‘दादागिरी’मध्ये त्याने अँकरींग केले आहे. हा शो बंगालमध्ये खूप लोकप्रिय आहे. या स्पेशल शोमुळे तो बंगाली टीव्ही इंडस्ट्रीत खूप लोकप्रिय झाला आहे. सध्या बातमी आहे की त्याने दादागिरी शो सोडल्याचे बोलले जात आहे.
स्टार जलसा वाहिनीसोबत 125 कोटींचा करार
मीडिया रिपोर्ट्सनुसार, माजी भारतीय क्रिकेटर सौरव गांगुलीने स्टार जलशा वाहिनीसोबत 125 कोटी रुपयांचा करार केला आहे.
बिग बॉस बांगलामध्ये दादाची झलक दिसेल का?
इंडिया टाइम्सच्या रिपोर्टनुसार, सौरव गांगुली लवकरच बिग बॉस बांगला आणि नवीन क्विझ शो होस्ट करताना दिसणार आहे. मात्र, त्याच्या नवीन क्विझ शोचे नाव अद्याप ठरलेले नाही. -सूत्रांच्या माहितीनुसार, सौरव गांगुलीचे हे दोन्ही शो जुलै 2025 पासून टीव्हीवर प्रसारित केले जातील. त्याचवेळी, अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की यावेळी बिग बॉस बांग्लामध्ये काही नवीन ड्रामा पाहायला मिळणार आहे. मात्र, या कराराबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
काय म्हणाला सौरव गांगुली
टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली सांगतो, स्टार जलशासोबत जोडल्याबद्दल मला खूप आनंद होत आहे. यामुळे मला लोकांशी जोडण्याचा एक खास मार्ग मिळाला आहे. यामुळेच मी वाहिनीशी जोडू शकलो. मला टीव्हीवर होस्टिंग करताना पाहून लोकांना आनंद होतो. क्रिकेटच्या पलीकडे लोकांशी जोडण्याच्या सामर्थ्यावर माझा विश्वास आहे आणि टीव्ही मला ते करण्याची संधी देतो.
