सरन्यायाधिश भूषण गवई यांचा संकल्प आणि निश्चय होता की कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे एक सर्किट बेंच असायला हवा. त्यांच्या प्रयत्नाला आज मोठ यश आलं आहे.
या सगळ्यामध्ये आम्हाला खारीचा वाटा उचलता आला त्याचही समाधान आहे अशा शब्दांत मुख्यमंत्रीफडणवीस यांनी कोल्हापूर येथील बेंचच्या उद्घाटनावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते कोल्हापूर येथे आयोजीत कार्यक्रमात बोलत होते.
काही दिवसांपूर्वी माझ्याकडं एक शिष्टमंडळ आलं होत की, कोल्हापूर किंवा पुण्यात सर्कीट बेंच असावं असं चाललं होत. परंतु, या शिष्टमंडळाने सांगितलं की यामध्ये पर्याय नसावा. फक्त कोल्हापूर येथेच बेंच असावं असा प्रस्ताव पाठवा असं या शिष्टमंडळाच म्हणणं होत असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केलं. त्यावेळी आम्ही निसंदीग्धपणे फक्त कोल्हापूर येथे बेंच असावं असं पत्र दिलं आणि त्यांना 100 कोटी मंजूर केले असंही फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.
त्याचबरोबर या सर्व घटनेला काही मुहूर्त रुप येत नव्हत. परंतु, भूषण गवई यांनी हे इतकं मनावर घेतलं की त्यांनी थेट तारीखच ठरवून टाकली उद्घाटनाची. कारण, भूषण गवई यांचं असं मत होत की, कोल्हापुरच्या लोकांना मुंबईला येण, तिथ राहण या गोष्टी परवडणाऱ्या आहेत का? असा प्रश्न विचारत त्यांनी हे कोल्हापूर येथे होण गरजेच आहे असंही ते म्हणाल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. यासाठी सर्वच पातळीवर कोल्हापुरच्या लोकप्रतिनीधींनी मदत केली असंही ते यावेळी म्हणाले.
येथे जी काही मदत लागेल ती आम्ही देणार आहोत. 1974 ला सुरू झालेला लढा म्हणजे 50 वर्षांचा लढा आज पूर्ण होत आहे. भारताचे सरन्यायाधिश भूषण गवई यांच्यामुळे हा लढा पूर्ण होत आहे. त्यांचे मी कोल्हापूर आणि या सर्किट बेंचच्यावतीने आभार मानतो असं म्हणत फडणवीस यांनी यावेळी गवई यांचे आभारही मानले.
