
दैनिक चालु वार्ता उदगीर प्रतिनिधी -अविनाश देवकते
लातूर (उदगीर) : शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, हंडरगुळी येथील पर्यवेक्षक व स्काऊट मास्टर सुगावे बालाजी यांना रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल तर्फे “राष्ट्राचे शिल्पकार पुरस्कार” प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार समारंभ विद्यालयात दि. १५ सप्टेंबर २०२५ रोजी पार पडला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रामचंद्र तिरुके (उपाध्यक्ष, मराठवाडा साहित्य परिषद, संभाजीनगर) व ब्र. कु. महानंदा बहेनजी (केंद्र संचालिका, प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, उदगीर) उपस्थित होते. अध्यक्षस्थानी रो. प्रशांत मांगुळकर (अध्यक्ष, रोटरी क्लब), उपाध्यक्ष रो. मोतीलाल डोईजोडे, सचिव रो. विक्रम हलकीकर तसेच प्रोजेक्ट चेअरमन रो. सौ. अन्नपूर्णा मुस्तादर उपस्थित होते.
या कार्यक्रमास रोटरी क्लबचे सर्व सदस्य, विद्यालयाचे मुखाध्यापक हाके एन.बी., शिक्षकवृंदातील कणसे व्ही.एस., संतोष सुतार, रामचंद्र घटकार, जाधव रविप्रकाश, नाटकरे बालाजी, मैलारे एम.टी. आदी मान्यवर उपस्थित होते.
रोटरी क्लबच्या वतीने देण्यात येणारा “राष्ट्राचे शिल्पकार पुरस्कार” हा शैक्षणिक, सामाजिक व व्यक्तिमत्व घडविण्याच्या कार्यात उल्लेखनीय योगदानासाठी दिला जातो. पर्यवेक्षक सुगावे बालाजी यांच्या दीर्घकालीन कार्याची दखल घेत हा सन्मान करण्यात आला.
शिक्षक हेच राष्ट्राचे खरे शिल्पकार असून त्यांच्या प्रेरणेतून विद्यार्थी घडतात, असा संदेश या पुरस्कार सोहळ्यातून देण्यात आला.