
रशियाची थेट अमेरिकेसह डोनाल्ड ट्रम्प यांना धमकी !
डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे सहकारी मागील काही दिवसांपासून भारतासह चीनला रशियाकडून तेल खरेदी करू नये, याकरिता धमकावताना दिसत आहेत. भारतावर तर अमेरिकेने 50 टक्के टॅरिफ लावला असून काही निर्बंध घालण्याची भाषा बोलली जात आहे.
अनेक वर्षांपासूनचे भारत आणि अमेरिकेतील चांगले संबंध तणावात आहेत. दुसरीकडे अमेरिका स्वत: चीनवर टॅरिफ लावत नाहीये. मात्र, नाटो देशांना एक पत्र लिहून त्यांनी स्पष्ट म्हटले आहे की, चीन जोपर्यंत रशियाकडून तेल खरेदी करतो तोपर्यंत आणि युक्रेन रशिया युद्ध थांबेपर्यंत 50 किंवा 100 टक्के टॅरिफ चीनवर लादा.
आता भारत आणि चीनला सातत्याने धमकावणाऱ्या अमेरिकेला जोरदार उत्तर रशियाने दिला आहे. रशियाचे विदेश मंत्री सर्गेई लावरोव यांनी अमेरिकेची निंदा करत त्यांच्यावर टीका केली. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, अमेरिका भारत आणि चीनला अशाप्रकारे धमक्या देऊन अल्टीमेटम देऊ शकत नाही. अमेरिकेच्या टॅरिफवर बोलताना त्यांनी म्हटले, यामुळे देश नवीन संशोधन आणि ऊर्जा बाजार शोधण्यासाठी मजबूर होत आहे.
अमेरिकेची नैतिकता आणि रणनीती पूर्णपणे चुकीची आहे. भारत आणि चीन दोन्ही महान देश असून त्यांचा इतिहास मोठा आहे. एक तर हे करा जे मला आवडते नाही तर मी तुमच्यावर टॅरिफ लावणार अशी भाषा त्यांच्यासोबत करणे पूर्णपणे चुकीचे आहे आणि यामुळे तुमचे कामही होणार नाही. भारतावर अमेरिकेने जी कारवाई केली ती अत्यंत चुकीची, अन्यायकारक आणि अव्यवहारिक असल्याचे स्पष्ट त्यांनी म्हटले. भारताचे स्पष्ट मत आहे की, त्यांची ही ऊर्जा निती पूर्ण जगासाठी चांगली आहे आणि जागतिक बाजारपेठेसाठी देखील.
भारतावर अमेरिकेने 50 टक्के टॅरिफ लावल्यानंतर रशिया हा भारताच्या मदतीला धावून आला. हेच नाही तर पुतिन यांनी नरेंद्र मोदी यांच्यासोबत फोनवर संवाद साधला. अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतर भारताचे होणारे नुकसान कशाप्रकारे भरून काढता येईल, यावर रशियाच्या अधिकाऱ्यांनी काम सुरू केले. हेच नाही तर भारताच्या वस्तूंचे आम्ही आमच्या बाजारपेठेत पूर्वीपेक्षाही मोठ्या प्रमाणात स्वागत करू असे स्पष्ट रशियाने म्हटले. भारतावर अमेरिकेच्या टॅरिफचा फार परिणाम पडला नाही पण अमेरिकेच्या बाजारपेठेवर वाईट परिणाम झाल्याचे दिसत आहे.