
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. कोणाचेही नाव न घेता त्यांनी पडळकरांना राजकारणात सुसंस्कृतपणा राखण्याचा सल्ला दिला आहे.
गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्यावर केलेल्या खालच्या पातळीवरील टीकेनंतर अजित पवारांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले की, राजकारणात कितीही मतभेद असले तरी, प्रत्येकाने बोलताना किंवा वागताना कुणालाही वेदना पोहोचणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे.
आमदार पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्याने आता त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विरोधकांकडून होत आहे.
जयंत पाटील यांच्यावर टीका करताना पडळकर यांनी जयंत पाटील यांच्या वडिलांचा उल्लेख करत टीका केली आहे. सांगलीच्या जत तालुक्यातील कनिष्ठ अभियंता अवधूत वडार आत्महत्या प्रकरणावरून आज आमदार पडळकर यांच्या नेतृत्वाखाली जत येथे जयंत पाटलांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला होता.
या मोर्चा दरम्यान जयंत पाटलांवर टीका करताना पडळकर म्हणाले की, माणसं पाठवली कशासाठी? गोपीचंद पडळकरने कुठल्या व्यापाऱ्याकडून पैसे घेतले का? अरे जयंत पाटला तुझ्या सारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही. माझ्यात कार्यक्रम करायची ती धमक आहे. तुझ्यासारखी ती अवलाद नाही. एवढ्या खालच्या लेव्हलला? आता माझा दांडीयाचा कार्यक्रम आहे. ये बघायला. तुझे डोळे दिपून जातील कार्यक्रम बघून अशी टीका आमदार पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर केली. तसेच यावेळी बोलताना पडळकर यांनी जयंत पाटलांवर वैयक्तिक टीका करत आहेत.