
32 रस्ते व कोंडी होणाऱ्या 22 ठिकाणांची होणार पाहणी…
पुण्यात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून, यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यांची कोंडीतून सुटका करण्यासाठी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पुढाकार घेतला असून, शहरातील प्रमुख 32 रस्ते आणि वाहतूक कोंडी होणाऱ्या 22 ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करून कोंडी का पुण्यात वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला आहे.
संथ गतीने वाहतूक होत असल्याने नागरिकांना तासभर आधीच घराबाहेर पडावे लागत आहे. 10 किलोमीटर अंतर जाण्यासाठी 33 मिनिटांचा वेळ लागत असल्याचे अनेक अहवालात पुढे आले आहे.
तसेच, वाहतूक कोंडीत पुण्याचा जगात पहिल्या 10 शहरांमध्ये क्रमांक लागतो. यामुळे अनेक कंपन्या पुण्याबाहेर जात आहेत. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून वाहतुकीचा वेग वाढविण्यासाठी महापालिका, वाहतूक पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, अजूनही ही समस्या कायम आहे.
शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. हे खड्डे चुकीच्या पद्धतीने दुरुस्त करण्यात आल्याने त्याचा परिणामदेखील वाहतुकीवर होत आहेत. या सोबतच अनेक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत.
रस्ता अरुंद झाल्याने वाहतूकदेखील संथ गतीने पुढे जाते. हातगाडे, पथारी, स्टॉल, पद पथांवर झालेले अतिक्रमण, अवैध बांधकाम यामुळे देखील वाहतुकीला अडथळा होत आहे. कारवाई करूनही पुन्हा अतिक्रमणे ’जैसे थे’ होत असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्नदेखील कायम आहे.
यामुळे आयुक्त नवल किशोर राम यांनी गुरुवारी पथ विभागाची बैठक घेत शहरातील 32 रस्ते आणि वाहतूक कोंडी होणाऱ्या 22 ठिकाणांची माहिती घेत या ठिकाणी अधिकाऱ्यांना पाठवून कोंडीची कारणे शोधण्यास सांगितली आहे.
यामध्ये पथ विभाग, बांधकाम विभाग, क्षेत्रीय कार्यालय, परिमंडळ कार्यालय, अतिक्रमण विभाग, विद्युत विभाग, आकाशचिन्ह या विभागांमधील अधिकारी, अभियंत्यांचा समावेश असून, त्यांना सोमवारपर्यंत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. सोमवारी या बाबतचा अहवाल आल्यावर पुढच्या बैठकीत त्यावर चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे.होते? याचा अहवाल सोमवार (दि.22) पर्यंत सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.