
आशिया चषक स्पर्धेतील १७ व्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यात सेमीचा थरार पाहायला मिळणार आहे.
गुरुवारी, २५ सप्टेंबला दुबईच्या मैदानात हे दोन्ही संघ जेतेपदाच्या लढतीत टीम इंडियाविरुद्ध भिडण्यासाठी एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकतील. बुधवारी याच मैदानात रंगलेल्या सामन्यात भारतीय संघाने बांगलादेश विरुद्ध स्पर्धेतील सलग पाचवा विजय नोंदवत फायनल जंक्शन गाठलंय.
पाक जिंकले तर इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार!
टीम इंडियाविरुद्धच्या पराभवानंतर २४ तासांच्या आत बांगलादेशचा संघ पुन्हा मैदानात उतरुन दुसऱ्या प्रयत्नात फायनल गाठण्यासाठी मैदानात उतरेल. दुसऱ्या बाजूला यंदाच्या आशिया चषक स्पर्धेत दोन वेळा भारताकडून सपाटून मार खाल्ल्यावर श्रीलंकेवर राग काढत पाकिस्तानच्या संघाने फायनलची दावेदारी भक्कम केलीये. जर या सामन्यात पाकनं बाजी मारली तर आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच IND vs PAK यांच्यात फायनलचा सामना रंगल्याचे पाहायला मिळेल. इथं एक नजर टाकुयात कुठं अन् कसा पाहता येईल PAK vs BAN यांच्यातील सामना? कसा आहे दोन्ही संघातील आतापर्यंतचा टी-२० तील रेकॉर्ड अन् सेमीच्या लढतीत कुणाचं पारडे आहे जड त्यासंदर्भातील सविस्तर माहिती….
पाकिस्तान-बांगलादेश यांच्यातील T20I मधील हेड टू हेड रेकॉर्ड
आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील बांगलादेशसमोर पाकिस्तानचं निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. आतापर्यंत दोन्ही संघात २५ टी-२० सामने झाले आहेत. यातील २० सामन्यात पाकिस्तानच्या संघाने विजय मिळवलाय. बांगलादेशच्या संघाला फक्त पाच वेळा विजय मिळता आलाय. बॅक टू बॅक मॅच खेळण्याची आलेली वेळ अन् त्यात पाकिस्तान विरुद्धचा खराब रेकॉर्डमुळे बांगलादेश संघासाठी ही खऱ्या अर्थाने अग्नी परीक्षा असेल. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे या गृहितकावर बांगलादेश सर्वकाही अवलंबून असेल.
भारतात कुठं अन् कसा पाहता येईल PAK vs BAN यांच्यातील सामना?
लाईव्ह स्ट्रीमिंग : SonyLIV अॅप आणि वेबसाइटसह फॅनकोड
टेलिव्हिजन: सोनी स्पोर्ट्स आणि सोनी स्पोर्ट्स
५ (इंग्रजी समालोचन)
सोनी स्पोर्ट्स
३ (हिंदी समालोचन)
सोनी स्पोर्ट्स
४ (तमिळ अन् तेलगू समालोचन)