
दैनिक चालु वार्ता मंठा प्रतिनिधी- सुरेश ज्ञा. दवणे.
जालना (मंठा )
“स्वच्छ मंठा, सुंदर मंठा” या संकल्पनेतून मंठा नगरपंचायत तर्फे “स्वच्छता ही सेवा” अभियानाचा शुभारंभ श्री रेणुका देवी मंदिर परिसरातून करण्यात आला. नगराध्यक्ष सौ. वंदनाताई वैजनाथ नाना बोराडे यांच्या हस्ते या अभियानाची सुरुवात झाली.
यावेळी नगराध्यक्षांनी नागरिकांना आवाहन केले की – “आपला मंठा स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने उत्स्फूर्तपणे सहभागी होणे आवश्यक आहे. लोकसहभागातूनच हे अभियान प्रभावी होईल.”
या प्रसंगी तालुकाध्यक्ष नितीन राठोड, संचालक वैजनाथ नाना बोराडे, मुख्याधिकारी मनोज उकिरडे, उपनगराध्यक्ष छायाताई वाघमारे, नगरसेविका यमुना दवणे, सभापती बाज पठाण, सचिन बोराडे, विकास सूर्यवंशी, उबेद बागवान आदी मान्यवर उपस्थित होते. स्वच्छता कर्मचार्यांना स्वच्छता कीटचे वाटप करण्यात आले.
नगरपंचायत प्रशासनाने शहरातील विविध भागातून स्वच्छता फेरी काढली. या उपक्रमात विद्यार्थी, सामाजिक संस्था, नागरिक तसेच ग्रामीण भागातील गावकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.