
मनोज जरांगेंचा थेट इशारा दिला !
ओबीसींची शक्ती दाखवण्यासाठी बीडमध्ये उद्या गुरुवारी (ता. 28) ओबीसींचा मेळावा मंत्री छगन भुजबळ यांनी आयोजित केला आहे. या मेळाव्याला राज्यभरातील ओबीसींनी उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
दरम्यान, ओबींच्या मेळाव्यात जो ओबीसीचा नेता जाईल,मराठे धड शिकवणार. स्टेजवर कोण जातंय यावर आमचं बारीक लक्ष आहे, असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
जरांगे पाटील म्हणाले, ‘येवल्याच्या अलीबाबाने आम्हाला पाठींबा देणाऱ्या मराठा नेत्यांना बघून घेण्याचे आव्हान ओबीसींना केले होते. आता मराठे बारीक लक्ष ठेऊन आहेत. मराठ्यांना आरक्षण मिळू नये, यासाठी हे व्यासपीठ आहे. जो नेता त्या व्यासपीठावर जाईल त्याला आम्ही पाडू. आता जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक आहेच की.
‘बीड जिल्ह्यातील ओबीसी नेत्यांना निवडून येण्यासाठी मराठ्यांची मतं लागतात. आणि ते त्या व्यासपीठावर जातात. बीड जिल्हा परिषदमध्ये जो नेता त्या व्यासपीठावर जाईल त्यानी दिलेली सगळ्या जागा (सीट) मराठे पाडतील. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस कुठल्याही पक्षाचा तो असेना त्याची सीट पाडणार.’, असे देखील ते म्हणाले. दरम्यान, शेतकऱ्यांवरील आलेले संकट पाहता बीड येथील ओबीसी मेळावा रद्द करण्यात आली असल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
भुजबळांना जाती वापरून घेतल्या…
‘ओबीसींच्या मेळाव्याला कोणत्य जातीतील लोक जातात, हे गावगावातील मराठे बघणार आहेत. छगन भुबळला जालन्यात जायला वेळ नाही. तेथे धनगर आरक्षणासाठी तो पोरगा जीवाची बाजी लावतोय. बंजारा समाज एसटीतील आरक्षणासाठी मोर्चे काढतोय. भुजबळानी ओबीसीमधील जाती फुकट वापरून घेतल्या. त्याला दुसरं काम नाही. ‘, अशी टीका ही जरांगे यांनी केली.
दसरा मेळावा होणार…
शेतकरी अडचणीत आहे. त्यामुळे मराठा समाजातील पोरांना शेतकऱ्यांना मदतीचे आवाहन मी केले आहे. या परिस्थितीमध्ये देखील नारायण गडावरील दसरा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला ताकदीने या असे मी म्हणणार नाही. कारण शेतकरी अडचणीत आहे.ज्यांना शक्य आहे ते येतील ज्यांना शक्य नाही ते येणार नाही.मात्र, दसरा मेळावा ही परंपरा आहे. त्यामुळे दोन हजार जण आले तरी मेळावा होणार, असे जरांगे पाटील यांनी सांगितले.