
फडणवीसांनी थेट हिस्ट्रीच काढली !
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (ता.26) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि त्यांना महाराष्ट्रातील पूरपरिस्थितीची माहिती दिली. त्यांनतर पत्रकारांशी संवाद साधतांना राज्यात प्रचंड पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं असून याबाबतच्या नुकसानीचा आढावा पंतप्रधानांना दिल्याचं सांगितलं.
तर यावेळी त्यांनी पूर्ण नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर त्याचे स्टेटमेंट राज्य सरकार केंद्राला देणार आहे. तर राज्याचा प्रस्ताव आल्यानंतर भरीव आर्थिक मदत देण्याचे आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिलं असल्याची माहिती फडणवीस यांनी यावेळी दिली.
शिवाय केंद्राला पाठवलेलं स्टेटमेंट बदलता येत नाही. त्यामुळे ते एकदाच पूर्ण तयार झाल्यानंतर त्याबाबतची माहिती दिली जाईल असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. दरम्यान, पत्रकारांनी विरोधक राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याती मागणी करत असल्याचा प्रश्न त्यांना विचारला.
शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्यासाठी पीएम केअर फंडातील पैसे वापरावे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्याचं सांगितलं. तसंच पंतप्रधान मोदींनी मराठवाड्याचा दौरा करावा आणि केंद्राने पुरेसा निधी द्यावा तसेच, एकरी 50 हजार रुपयांची मदत द्यावी अशी मागणी ठाकरेंनी केल्याचं सांगताच.
फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरेंनी आर्थिक मदत देण्यासंदर्भात राज्य सरकारला शहाणपण शिकवू नये. कारण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असातना केंद्राने त्यांना पीएम केअर फंडासारखा एक फंड तयार करण्याची परवानगी दिली होती. कोरोनात तो तयार देखील झाला आणि त्या फंडात 600 कोटी रुपये जमा झाले. मात्र, त्यातील एक नवा पैसा ते खर्च करू शकले नाहीत.
त्यामुळे आता सीएजीच्या नियमांप्रमाणे कोरोनासाठी तो फंड तयार झाला असल्यामुळे आम्हाला तो इतरत्र खर्च करता येत नसल्यामुळे त्या फंडाचे काय करायचे? हा प्रश्न आमच्यासमोर आहे. लोकांनी दिलेले 600 कोटी या फंडात असताना लोक तिथे पटापट मरत असताना, ते एक पैसा देखील खर्च करता न आलेल्यांनी किती शहाणपण शिकवावे हे त्यांनीच ठरवावे, अशी टीका फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर केली.